युरिक ऍसिड हे आपल्या शरीरात तयार होणारे एक प्रकारचे टॉक्सिन आहे जे प्रत्येकाच्या शरीरात तयार होते. जेव्हा यूरिक ऍसिड तयार होते, तेव्हा किडनी ते फिल्टर करतात आणि मूत्राद्वारे शरीरातून काढून टाकतात. यूरिक ऍसिडच्या तयार होण्यासाठी आहार अत्यंत जबाबदार आहे. अधिक प्रमाणात प्युरिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने युरिक अॅसिडची पातळी वाढते. युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने हात-पायांच्या सांध्यांमध्ये वेदना होतात आणि उठणे-बसणे कठीण होते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूरिक अॅसिड नॉर्मल रेंजमध्ये असणे ठीक आहे, परंतु जर त्याचे प्रमाण जास्त वाढल्यास शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात. युरिक ऍसिड वाढल्याच्या लक्षणांमध्ये बोटे आणि पायाची बोटे दुखणे, घोट्यात दुखणे, सूज येणे, त्वचा लाल होणे, किडनी खराब होण्याचा धोका, किडनी स्टोन आणि असह्य वेदना यांचा समावेश होतो. हे ऍसिड रक्तात मिसळून रक्त दूषित करतात आणि शरीरात अनेक प्रकारचे विकार निर्माण करतात.जर युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले तर ते आपल्या शरीरातील अनेक अवयवांना नुकसान पोहोचवू शकते.

( हे ही वाचा: तुमच्या नखांवरही पांढरे डाग आहेत का? ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो इशारा, वेळीच सावध व्हा)

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.प्रताप चौहान यांच्या मते, युरिक ऍसिडच्या रुग्णांनी जेवणात काही गोष्टींचा समावेश केला आणि काही गोष्टी टाळल्या तर ही समस्या टाळता येऊ शकते. काही लोकांचा असा विश्वास आहे की मीठ खाल्ल्याने यूरिक ऍसिड वाढू शकते. चला आयुर्वेदिक तज्ञांकडून जाणून घेऊया मिठाच्या सेवनाने खरोखरच युरिक ऍसिड वाढू शकते का?

मिठाच्या सेवनाने युरिक ऍसिड वाढू शकते का? Is salt can increase uric acid?

मीठ हा आपल्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याशिवाय अन्नाची चव अपूर्ण आहे. मिठाचे सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास ते शरीरासाठी चांगले असते. पण जास्त मीठ खाल्ल्याने अनेक आजारांना बळी पडू शकते. जास्त मीठ उच्च रक्तदाबाच्या समस्येचा धोका तर वाढवतेच पण त्याचे सेवन केल्याने अनेक आजारांचा धोकाही वाढू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी मीठाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

( हे ही वाचा: तुमच्या ‘या’ १० सवयी वेळीच बदला; नाहीतर कधीही होऊ शकते किडनी खराब)

मीठ यूरिक ऍसिड कसे नियंत्रित करते? संशोधनात असा झाला खुलासा

नवीन संशोधन असे सूचित करते की उच्च सोडियमचे सेवन यूरिक ऍसिडच्या समस्येवर शरीरावर सकारात्मक परिणाम करू शकते. १५ ऑगस्ट रोजी जर्नल ऑफ आर्थराइटिस अँड रूमॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, सरासरी सोडियमपेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास युरिक ऍसिड नियंत्रित केले जाऊ शकते.

युरिक अॅसिडच्या रुग्णांनी रॉक सॉल्टचे सेवन करा, शरीराला अधिक फायदा होईल. किडनी स्टोनवरही रॉक सॉल्ट खाऊन उपचार करता येतात. याचे सेवन केल्याने हाडांचे दुखणे आणि सूज यापासून आराम मिळतो.

( हे ही वाचा: सकाळी उठून फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; Blood Sugar Level राहील नियंत्रणात)

युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी हे पदार्थ खा

  • क्षारयुक्त आहार व क्षारयुक्त पाण्याचे सेवन करा, युरिक ऍसिड नियंत्रण राहील.
  • हिरव्या भाज्या आणि फळे खा. फळांमध्ये सफरचंद किंवा सफरचंद व्हिनेगरचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
  • ओट्स खा
  • बदाम आणि अक्रोडाचे सेवन करा.
  • एलोवेरा जेलचे सेवन करा.
  • गाजर आणि बीटरूटचा रस पिऊन तुम्ही यूरिक अॅसिड नियंत्रित करू शकता.
  • आवळ्याचे सेवन करा.
  • नारळ पाणी प्या.
  • पोट स्वच्छ ठेवा.
  • जीवनशैलीत बदल करा.
  • वेळेवर खा आणि झोपा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is salt can increase uric acid know the truth from expert gps
First published on: 14-11-2022 at 15:52 IST