scorecardresearch

Premium

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उसाचा रस फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या

अनेकदा मनात प्रश्न येतो की मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस सेवन करावा की नाही? चला तर मग जाणून घेऊया काय बरोबर आहे.

sugarcane juice
(File Photo Indian Express )

उन्हाळा आला आहे. गरमीपासून आराम मिळण्यासाठी लोक विविध गोष्टींचा अवलंब करतात, त्यातील एक म्हणजे उसाचा रस. उन्हाळ्यात उसाचा रस खूप प्यायला जातो. यामुळे उष्णतेपासून आराम तर मिळतोच शिवाय अनेक आजारांपासून दूर राहण्यासही मदत होते. यकृत, रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. साहजिकच गोड उसाचा रस हा पौष्टिक तसेच आरोग्यासाठी चांगला मानला जातो, पण अनेकदा मनात प्रश्न येतो की मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस सेवन करावा की नाही? चला तर मग जाणून घेऊया काय बरोबर आहे.

मधुमेहींनी उसाचा रस प्यावा का?

उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेही रुग्णांना त्रास होऊ शकतो. मधुमेही रुग्णांनी उसाच्या रसापासून दूर राहावे. उसाचा रस रिफाइंड न करता थेट उसातून काढला जातो, त्यामुळे साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहामध्ये त्याचा रस सेवन करू नये.

How ragi can control blood sugar
Blood sugar: मधुमेह असेल तर आहारामध्ये ‘या’ पदार्थाचे सेवन लगेच वाढवा! जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला
daughter in law and mother in law bond
मुलींनो, सासूबरोबर पटत नाही; मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Diabetic Kidney
मधुमेहाचा तुमच्या किडनीवर परिणाम होत आहे की नाही, हे कसं ओळखाल? कोणते पदार्थ खाणे टाळावेत? डाॅक्टर सांगतात…
CTET Result 2023
प्रतीक्षा संपणार! सीटीईटी निकालाबाबत समोर आली मोठी अपडेट; निकाल कधी लागणार? जाणून घ्या

(हे ही वाचा: Diabetes Diet: मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आवर्जून खा ‘या’ ३ हिरव्या भाज्या!)

उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, पण साखरेचे प्रमाणही त्यात जास्त असते, त्यामुळे हा रस मधुमेहींसाठी आरोग्यदायी नाही. एक कप (२४० मिली) उसाच्या रसामध्ये ५० ग्रॅम साखर असते, जी १२ चमचे असते. उसाच्या रसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि जास्त ग्लायसेमिक लोड (GL) असतो. याचा अर्थ तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा परिणाम होतो.

(हे ही वाचा: Diabete: ‘या’ ३ वाईट सवयींचा मधुमेहाच्या रुग्णांना अधिक धोका! रक्तातील साखरेची पातळी सहज बिघडते)

(ही माहिती सामान्य ज्ञानाच्या आधारावर लिहिली आहे. गरजेनुसार तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is sugarcane juice good or bad for diabetics find out ttg

First published on: 22-03-2022 at 15:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×