How to keep hands warm in winter: हिवाळ्याच्या काळात घरातील कामे करणे खूप आव्हानात्मक असू शकते. थंड पाण्याने भांडी धुणे हे एक मोठे आव्हान ठरू शकते. विशेषतः या हंगामात थंडीमुळे हात सुन्न होऊ शकतात आणि कधी कधी बोटांमध्ये मुंग्या येऊ शकतात. अशा वेळी थंड पाण्याने जास्त वेळ हात धुतल्याने कधी कधी वेदना होऊ शकतात. त्यामुळे घरातील कामे करणे खूप कठीण होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी आम्ही काही सोपे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, जे नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
हिवाळ्यात भांडी धुण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
कोमट पाणी वापरा
हिवाळ्यात ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. भांडी धुण्यापूर्वी तुम्ही पाणी कोमट करा. त्यामुळे तुमचे हात सुन्न होणार नाहीत आणि भांड्यांची साफसफाई करणे सोपे होईल. थंडीत हातांना उबदारपणा जाणवेल.
हातांत हातमोजे घाला
तुम्ही भांडी धुण्यासाठी हातमोजेदेखील वापरू शकता. तुम्ही बाजारातून रबरी हातमोजे खरेदी करू शकता. भांडी धुताना त्यांचा वापर केल्याने तुमचे हात थंड पाण्याच्या थेट संपर्कात येणार नाहीत आणि त्या कारणामुळे येणारा सुन्नपणा कमी होईल. हातमोजे तुमच्या हातांचे पाणी आणि डिटर्जंटच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करतात.
हातांचा व्यायाम करा
भांडी धुण्यापूर्वी काही मिनिटे हातांचा व्यायाम करा. तुम्ही तुमची बोटे, हाताच्या मुठी घट्ट आवळू शकता आणि मनगटे गोल फिरवू शकता. त्यामुळे तुमच्या हातांतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे थंडीचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते.
हातांना मॉइश्चरायझर लावा
थंड पाण्याने भांडी धुतल्यानंतर तुमचे हात व्यवस्थित कोरडे करा. त्यानंतर तुमच्या हातांना मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावा. त्यामुळे तुमचे हात हायड्रेटेड राहण्यास आणि मऊ राहण्यास मदत होते. जर तुमचे हात खूप जास्त प्रमाणात थंडावले असतील, तर तुम्ही काही वेळ उन्हात बसा.
भांडी घासण्याआधी हातांना तेल / क्रीम लावा
रात्रीच्या वेळी वातावरणात जास्त गारवा असल्यास भांडी घासण्यापूर्वी दोन्ही हातांना नारळ तेल, बदाम तेल किंवा जाडसर हँड क्रीम लावा, जेणेकरून थंड पाण्याचा थेट परिणाम कमी होतो.
सकाळी खूप लवकर किंवा रात्री उशिरा भांडी घासणे टाळा
हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी आणि रात्रीच्या वातावरणामध्ये प्रचंड थंडावा असतो. त्यामुळे सकाळी लवकर आणि रात्री उशिरा भांडी घासणे टाळा. त्याऐवजी तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी भांडी घासू शकता.
