Jaggery safe during diabetes ? जगभरात डायबिटीसचे रुग्ण वाढत चालले आहेत. साधारणतः शुगरचा आजार, असंही याला म्हटलं जातं. अनेकांना खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अगदी लहान वयापासूनच शुगरचा त्रास सतावत आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांना साखर वर्ज्य करण्यास सांगण्यात येते. मात्र, अशा वेळी पूर्वी गोड पदार्थांमध्ये गूळ खायला सांगितले जायचे.
पण, खरंच साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने डायबिटीस वाढत नाही का?
डायबिटीसचे रुग्ण गूळ खाऊ शकतात हे खरे आहे; मात्र जेव्हा गूळ शुद्ध मिळत होता तेव्हाची ही गोष्ट आहे. सध्या शुद्ध गूळ मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे हल्ली गूळ हा साखरेपेक्षाही अधिक घातक ठरतोय. त्यामुळे आपल्याला हव्या त्या प्रमाणात शुगरच्या रुग्णांनी गूळ खाणे टाळायला हवे. त्यासह चुकीच्या जगण्याच्या पद्धतीमुळेच डायबिटीस वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले आणि शुगर नक्की का वाढतेय याची कारणेही सांगितली.
मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे, ज्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यासाठी अन्नाशी संबंधित अनेक गोष्टी टाळणे आवश्यक आहे. मधुमेहात गोड पदार्थ विशेषतः अपायकारक आहेत. अशा परिस्थितीत लोक चहा, गोड पदार्थ इत्यादी टाळतात. अनेकांना असे वाटते की, मधुमेहात साखरेऐवजी गूळ खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते; परंतु तज्ज्ञ हा समज पूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात की, गुळामध्ये अंदाजे ६५ ते ८५ टक्के सुक्रोज असते. गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि मधुमेह आणखी बिघडू शकतो.
मधुमेहींनी गुळाचेही सेवन टाळावे, असा सल्ला डॉक्टर देतात. साखर आणि गुळात समान प्रमाणात कॅलरीज असतात. गूळ साखरेपेक्षा किंचित कमी रिफाईंड असतो. अगदी मधातही गूळ आणि साखरेइतक्याच कॅलरीज असतात. म्हणून गूळ हा मधुमेहासाठी सुरक्षित मानला जातो. कारण- त्यात नैसर्गिक साखर आहे, असे मानले जाते आणि आपल्या देशात नैसर्गिक उत्पादने खूप सुरक्षित मानली जातात.
हल्ली बरेच जण योग्य रीतीने डाएट फॉलो करत नाहीत. कधीही कोणतेही पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्याला अधिक त्रास होतो. खाण्यामध्ये सर्व व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे संतुलन असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा खाण्यात काही ना काही तत्त्वांची कमतरता राहते आणि त्यामुळे डायबिटीस हा आजार होतो.

