Naturally Losing Belly Fat : जपान हा देश केवळ तंत्रज्ञान, शिस्तीसाठी प्रसिद्ध नसून तेथील रहिवाश्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठीही ओळखला जातो. जपानी लोक इतके वर्ष तंदुरुस्त आणि आनंदी कसे राहतात, हे समजून घेण्याचा जगभरातील संशोधक प्रयत्न करत आहेत. या प्रश्नाचे एक मनोरंजक उत्तर म्हणजे ‘इकिगाई’. जे दीर्घकाळ आणि आनंदी आयुष्य जगणाऱ्या जपानचे रहस्य आहे. इकिगाई ही एक जपानी संकल्पना असून, त्याचा अर्थ ‘जगण्याचे कारण’ असा होतो. हा शब्द ‘इकी’ आणि ‘गाई’ या दोन भागांपासून बनलेला आहे. इकिगाई म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हाला रोज सकाळी आनंदाने उठायला प्रेरणा देते.
इकिगाई हा केवळ एक विचार नाही तर जीवनशैली आहे. जीवन म्हणजे केवळ जगणे नव्हे, तर समजून घेणे आणि अनुभवणे यामध्ये खरी मजा असते. इकिगाई हा विचार जगासमोर आणते. हे एक असे पुस्तक आहे, जे तुम्हाला शिकवते की, तुम्ही दररोज सकाळी का उठले पाहिजे. इकिगाईचा शब्दशः अर्थ ‘जगण्याचे कारण’ असा होतो. म्हणजेच, एखादं कारण जे तुम्हाला दररोज ऊर्जा आणि आनंदाने पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.
तर जपानमध्ये, ही केवळ एक कल्पना नसून, एक जीवनशैली म्हणून स्वीकारली गेली आहे. जपानमध्ये, लोकांची जीवनशैली आणि आहार त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सडपातळ शरीरासाठी पूर्णपणे जबाबदार असतात आहे. जपानमध्ये, लोक आपले शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी चार विशेष पद्धतींचा अवलंब करतात. चला, त्या चार पद्धतींबद्दल जाणून घेऊया ज्या तुमचे शरीर निरोगी आणि सडपातळ ठेवण्यास आणि तुमचे आयुष्य वाढविण्यात मदत करतात.
सकाळी लवकर उठणे
जपानमध्ये, सकाळी लवकर उठणे ही केवळ एक सवय नसून, ती एक जीवनशैली आहे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता, तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो. तुम्ही बागेत फिरायला जाऊ शकता, योगा किंवा ध्यान करू शकता, एखादे पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचू शकता. या छोट्या गोष्टींमुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सकाळची शांतता तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश समजून घेण्यास मदत करते.
८०% पोट भरण्याचा नियम
‘हारा हाची बू’ (Hara Hachi Bu) हा जपानचा एक गोल्डन नियम आहे. याचा अर्थ आहे, पोट भरलंय असं वाटायच्या आधीच जेवण थांबवायचं. आपले पोट फक्त ८० टक्केचं भरलं पाहिजे. या नियमाचे पालन केल्याने अति खाणे टळते, पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, तर नेहमी तुमच्या भुकेपेक्षा थोडे कमी खा. वजन कमी करण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये दडलेलं रहस्य
जपानी लोक त्यांच्या ताटात रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश करतात, ज्याला ‘रेनबो डाएट’ (इंद्रधनुष्य आहार) म्हणून ओळखले जाते. हा आहार, ज्यामध्ये विविध रंग, विविध पोषक तत्वे, कमी चरबी आणि उच्च फायबर यांचा समावेश असतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हा साधा आणि संतुलित आहार उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांना देखील प्रतिबंध घालतो.
लहान ताट वापरणे
जपानी लोक जेवण्यासाठी लहान ताटांचा वापर करतात. लहान ताटांमध्ये कमी अन्न असते, ज्यामुळे त्यांना पोट भरल्यासारखे वाटते, आणि यामुळे मनाला लवकर समाधान मिळते. लहान ताटांमध्ये जेवल्याने अति खाणे टाळता येते. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे, निरोगी शरीराचे आणि कमी वजनाचे रहस्य त्यांच्या कमी मसाले आणि कमी तेलाच्या आहारात दडलेले असते.
निष्कर्ष
जपानी लोकांच्या तंदुरुस्तीचे आणि दीर्घायुष्याचे रहस्य जादूत नसून, शिस्त आणि छोट्या सवयींमध्ये आहे. जर तुम्हालाही तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, पोटाचा घेर कमी करायचा असेल आणि निरोगी, दीर्घायुष्य जगायचे असेल. तर तुम्ही या सवयींना तुमच्या जीवनाचा भाग बनवू शकता…
