Gardening Tips in Marathi: आपल्या बाल्कनीची शोभा वाढविण्यासाठी आपण विविध प्रकारची रोपं लावतो आणि मग ती रोपं चांगल्या रीतीनं बहरावीत यासाठी रोज काही ना काही उपाय करीत असतो. पण, तुम्ही हे काम जर योग्य पद्धतीनं केले नसेल, तर या मेहनतीचा फार काही उपयोग होतोच असं नाही. विशेषतः फुलझाडांसाठी महागड्या खतांची गरज नसते; तर तुम्ही अगदी घरगुती पद्धतीनेसुद्धा खत तयार करून रोपांना बहर आणू शकता.
झाडाच्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातल्या तीन वस्तूंचा वापर करून खत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. हे खत गुलाब, मोगरा, जास्वंद तसेच इतर फुलांच्या झाडांसाठी उपयोगी ठरतं.
शेणखत
शेणखत झाडांसाठी अतिशय फायदेशीर असत. त्यात जे नायट्रोजन असते त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. तसंच झाडावरील फांद्या मजबूत होतात. या खताच्या वापरामुळे पानांचा आकार मोठा होऊन पाने हिरवीगर आणि तजेलदार होतात.
मात्र हे खत असेच ना देता त्याचे लिक्विड खत तयार करून द्या, कारण उन्हाळ्यात जर अशाप्रकारे तुम्ही लिक्विड खत तयार करून झाडांना दिलीत तर झाडांना खूप चांगला असा फायदा होतो. जे शेणखत आहे ते दोन ते तीन दिवस पाण्यात भिजत ठेवायचे जेणेकरून यातली जी पोषकतत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि जे खत आहे ते तयार होते.
तयार झालेल्या खताचा वापरदेखील थेट झाडांवर ना करता ते पाण्यामध्ये डायल्युट करून नंतरच वापर करायचा आहे म्हणजे जर एक मग तयार झालेले खत घेतलेले असेल तर त्यामध्ये तीन ते चार मग साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर झाडांना करायचा आहे. कारण तयार झालेले खत हे थोडे स्ट्रॉंग असते.
खायचा चुना
खत म्हणून वापरायची दुसरी वस्तू म्हणजे खायचा चुना. चुना देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त असतो. कारण त्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे झाडावरच्या फांद्या मजबूत होण्यासाठी चांगला फायदा होतो. चुन्याचे ३ ते ४ खडे चमच्यात घेऊन ते शेणखताच्या पाण्यात मिक्स करायचे.
राख
जी तिसरी वस्तू आपण खत म्हणून वापरणार आहोत ती म्हणजे राख. लाकूड जाळल्यानंतर राख तयार होते. राखेमध्ये ज्या काळ्या फुले येण्यासाठी घटकांची, पोषकतत्वांची म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरससारखे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे याचा वापर जर तुम्ही झाडांसाठी केलात तर झाडांना भरपूर अशी फुले लागतील.
जर दीड ते दोन लिटर खत तयार केलेले असेल तर त्यात एक चमचा राख व्यवस्थित मिक्स करायची आहे. हे खत झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या मुळातील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करायची जेणेकरून हे खत मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल.