देशातील मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लानमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे कोणता प्लान निवडावा? असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे. अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा स्पीडही महत्त्वाचा आहे. त्यामुळे कमी किंमती प्लान वापरणारे ग्राहक सर्वाधिक आहेत. अद्यापही २५० रुपयांपेक्षा कमी किमती असलेले प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. यात डेटा, कॉलिंग आणि इतर सुविधाही मिळतात. अशाच २५० रुपयांच्या आतील एअरटेल आणि जिओ प्लानबद्दल जाणून घेऊयात.

जिओ नेटवर्कएअरटेल नेटवर्क
१४९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस (२० दिवस)
१५५ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि ३०० एसएमएस (२४ दिवस)
१७९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस (२४ दिवस)
१७९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि ३०० एसएमएस (२८ दिवस)
२०९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस (२८ दिवस)
२३९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस (२४ दिवस)
११९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा,अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस (१४ दिवस)
१९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा,अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस (२३ दिवस)
२३९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा,अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस (२८ दिवस)
२४९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा,अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस (२३ दिवस)

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सिमकार्ड असतील तर बंद होणार सेवा; सरकारने स्पष्ट केलं की…

Jio 299 Recharge Plan:२९९ रुपयांच्या जिओ रिचार्जवर २०% कॅशबॅक दिला जात आहे. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये यूजरला दररोज २ जीबी हायस्पीड डेटा मिळेल. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत असेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध असतील. तसेच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शनही मिळेल. या प्लॅनमध्ये ६० रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे.

Jio 666 Recharge Plan: जिओच्या ६६६ रुपयांच्या रिचार्जवर २० टक्के कॅशबॅक दिला जात आहे. या प्लॅनची ​​वैधता ८४ दिवसांची आहे. यामध्ये यूजरला दररोज १.५ जीबी हायस्पीड डेटा मिळेल. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत असेल. यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शनही मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध असतील. या प्लॅनमध्ये १३३ रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे.

Jio 719 Recharge Plan: जिओच्या ७१९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता ८४ दिवस आहे. यामध्ये यूजरला दररोज १.५ जीबी हायस्पीड डेटा मिळेल. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत असेल. या प्लॅनमध्ये २० टक्के कॅशबॅक दिला जात आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध असतील. यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शनही मिळेल. या प्लॅनमध्ये १४४ रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे.

जिओ वापरकर्त्यांच्या खात्यात रिचार्ज केल्यानंतर ३ दिवसात कॅशबॅक मिळेल. यानंतर वापरकर्ते जिओ रिचार्ज, जिओ मार्ट, रिलायन्स मार्ट, रिलायन्स स्मार्ट, एजिओ, रिलायन्स ट्रेण्ड, रिलायन्स डिजिटल आणि नेटमेड्ससारख्या जिओ पार्टनर स्टोअर्समधून या कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात.