जिओ रिलायन्सने केली दरवाढ; नेटीझन्सने ट्विटरवर ट्रेंड केला #BoycottJioVodaAirtel

अंबानींच्या रिलायन्स जिओने प्लॅन महाग केले यावर नेटीझन्स म्हणत आहेत की, पैसे 5G मग 2G चा स्पीड का? ही डिजिटल लूट आहे.

BoycottJioVodaAirtel
#BoycottJioVodaAirtel ट्विटरवर ट्रेंड (प्रातिनिधिक फोटो )

भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया नंतर देशातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटर रिलायन्स जिओने रविवारी (२८ नोव्हेंबर २०२१) प्रीपेड दरांमध्ये २१ टक्के वाढ करण्याची घोषणा केली. ही वाढ पुढील महिन्यापासून लागू होणार आहे.पॅकच्या किमतीत वाढ करूनही, जिओने एअरटेल आणि व्ही (Vi) पेक्षा किमती कमी ठेवल्या आहेत, त्यानंतर टेलिकॉम उद्योगात किमतीची स्पर्धा कायम राहील असा विश्वास आहे. मात्र, कंपनीने दर महाग केल्याबद्दल सोशल मीडियावर लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ट्विटर वापरकर्त्यांनी याला डिजिटल रॉबरी म्हटले आणि विचारू लागले की कंपन्या 5G नुसार पैसे आकारत असताना 2G स्पीड का देत आहेत? यादरम्यान काही लोकांनी निषेधार्थ ट्विटरवर #BoycottJioVodaAirtel ट्रेंड करण्याचा प्रयत्न केला.
@HansrajMeena या नावाच्या युजरने जियो, एयरटेल आणि व्ही (Jio, Airtel, Vi ) ला टॅग करत ट्विट केले, “पैसा 5G ची गती 2G का? संपूर्ण जगात टेलिकॉम कंपन्यांचा महिना २८ दिवसांचा का असतो? आयुष्यभरासाठी सिम कार्ड दिलेले असताना दर महिन्याला इनकम का थांबवायचे? जनतेची लूट थांबवा.”

( हे ही वाचा: Reliance Jio Plans Hike: जिओ रिलायन्सच्या वापरकर्त्यांना मोठा झटका; ४८० रुपयांपर्यंत प्लॅन महागले, पाहा नवीन दर )

@SanjayKumawat04 या नावाच्या युजरने लिहिले, “डिजिटल लुटमार थांबवा! किंमत वाढवा, किंमत कमी करा.” @Rk659433Kumar युजर म्हणाले, “टेलिकॉम कंपन्यांची मनमानी चालणार नाही.” @TribalArmy या हँडलने आवाहन केले की चला Jio, Vi आणि Airtel वर बहिष्कार टाका आणि BSNL वर स्विच करू.

जिओ डेटा प्लॅनही (Jio Data Plans) होणार महाग

५१ रुपयांच्या जिओ डेटा व्हाउचरसाठी, आता वापरकर्त्यांना ६१ रुपये, १०१ रुपयांच्या प्लॅनसाठी १२१ रुपये आणि २५१ रुपयांच्या प्लॅनसाठी ३०१ रुपये खर्च करावे लागतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jio reliance raises rates netizens trended on twitter boycott jio vodafone airtel ttg

ताज्या बातम्या