एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर निश्चिंत राहा… जाणून घ्या Jio च्या ३४९९ च्या वार्षिक प्लॅनमधील सेवा, फायद्यांबद्दल

विशेष म्हणजे पहिल्यांदाच जिओने अशाप्रकारे दिवसाला तीन जीबी डेटा या हिशोबाने वार्षिक प्लॅन ग्राहकांसाठी बाजारात आणलाय. या प्लॅनचे फिचर्स, किंमत आणि फायद्यांबद्दल…

jio yearly recharge plan 2021 price validity and benefits
दिवसाचा तीन जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होईल, (मूळ फोटो रॉयटर्सवरुन साभार)

रिलायन्स जिओ कंपनीने ३ हजार ४९९ रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनची घोषणा केलीय. कंपनीने फ्रिडम प्लॅन्सच्या नावाखाली १२७ रुपयांपासूनच्या अनलिमिटेड डेटा प्लॅनची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच हा वार्षिक प्लॅनची घोषणा करण्यात आलीय. या नवीन वर्षिक प्लॅनमध्ये दिवसाला ३ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यावर वर्षभरामध्ये एक हजार ९५ जीबी डेटा युझर्सला वापरता येणार आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अन-लिमिटेड फोन कॉल्सची सेवा ३६५ दिवसांसाठी म्हणजेच वर्षभराच्या व्हॅलिटीडीसहीत मोफत देण्यात आलीय. दिवसाचा तीन जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत खाली येईल. विशेष म्हणजे पहिल्यांदाच जिओने अशाप्रकारे दिवसाला तीन जीबी डेटा या हिशोबाने वार्षिक प्लॅन ग्राहकांसाठी बाजारात आणलाय. यापूर्वी दिवसाला ३ जीबी डेटा वापरण्याची मूभा असणारे प्लॅन्स हे २८,५६ आणि ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत यायचे. देशातील सर्व युझर्सला हा वार्षिक डेटा प्लॅन घेता येणार आहे.

रिलायन्स जिओच्या या ३ हजार ४९९ वार्षिक रिचार्जमध्ये काय काय आहे पाहुयात…

> या रिचार्जची व्हॅलिडिटी ही ३६५ दिवस असेल.

> दिवसाला तीन जीबी डेटा वापरता येणार आहे.

> दिवसाला १०० मोफत मेसेज देण्यात आले आहेत.

> कोणत्याही नेटवर्कवर अन-लिमिटेड व्हॉइस कॉलची सुविधा देण्यात आलीय.

> तसेच हा रिचार्ज केल्यानंतर जिओ सूट अ‍ॅप्सचा लाभ घेता येणार आहे.

> जिओ सूट अ‍ॅप्समध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ सिक्युरीटी आणि जिओ न्यूज या सेवांचा समावेश आहे.

> जिओचा हा सर्वात महागडा ३ जीबी डेटा प्लॅन असला तरी तो वर्षभरासाठी आहे. यापूर्वी कंपनीने ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा डेली ३ जीबी फ्री असणाऱ्या प्लॅन ९९९ रुपयांना उपलब्ध करुन दिलेला.

फाइव्ह जी आणि सर्वात स्वस्त फोन…

आठवड्याभरापूर्वी झालेल्या जिओच्या सर्व साधारण वार्षिक सभेमध्ये म्हणजेच रिलायन्स एजीएम २०२१ च्या निमित्ताने कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी फाइव्ह जी तंत्रज्ञान लवकरचा भारतात आणणार असल्याचं सांगितलं, भारत टू जी मुक्त आणि फाइव्ह जी युक्त करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही फाइव्ह जी इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आणि फाइव्ह जी उपकरणांची श्रेणी विकसित करण्यासाठी जागतिक भागीदारांसह काम करत आहोत. जिओ केवळ भारत टू जी मुक्त करण्यासाठीच नव्हे तर फाइव्ह जी युक्त करण्याकरिता कार्य करीत असल्याचं अंबानी म्हणाले. या सभेमध्ये जिओ फोन नेक्स्टची घोषणाही करण्यात आली. जिओ फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगात सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा वार्षिक सभेदरम्यान या फोनची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jio rs 3499 prepaid recharge plan launched in india price validity and benefits scsg

ताज्या बातम्या