येणार्‍या काळात काय होईल? हे कुणालाच माहीत नसतं. प्रत्येकाचे भविष्य अनिश्चित आहे. विशेषत: करोना संकटाच्या काळात अनिश्चिततेचं वातावरण आहे. करोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. असं संकट येईल याचा स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. नोकरी गेल्यामुळे कर्जाचे हप्ते कशे भरायचा असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. मात्र, नीट नियोजन केल्यास या संकटाला तोंड देण्याची तयारी करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही कंपन्या जॉब इन्शुरन्स पॉलिसी देतात. या कंपन्या पॉलिसी होल्डर आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक गरजेची पुर्तता करतात. जर तुमची नोकरी अचानक गेली तर तुम्हाला अडचणीच्या काळात ही पॉलिसी कामी येते. या पॉलिसीच्या मदतीने आर्थिक अडचण दूर केली जाऊ शकते. तसेच ईएमआयही भरू शकता. मात्र भारतात अशा पॉलिसी अजूनही नाहीत. मात्र राइडर बेनेफिटच्या आधारे याचा लाभ घेता येऊ शकतो. विमाधारक आपल्या पॉलिसीत जॉब कव्हर अ‍ॅड करू शकतो. हा कव्हर गंभीर आजार आणि दुर्घटनेदरम्यान कामी येतो. काही कंपन्या पर्सनल लोनसाठीही कव्हरेज देतात. नोकरी गेल्यास या कंपन्या पॉलिसी असेपर्यंत ठराविक महिन्यांसाठी ईएमआय भरतात. त्यामुळे पॉलिसीचा अवधी संपेपर्यंत कोणतीही चिंता नसते. तसेच नविन नोकरी मिळेपर्यंत दिलासा मिळतो. असं असलं तरी ही पॉलिसी सर्वांसाठी उपलब्ध नाही. यासाठी काही अटी आणि शर्थी आहेत.

वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शाळेसाठी पाच टॉप ब्रॉडबँड प्लान; जाणून घ्या

या पॉलिसीचा लाभ नोंदणीकृत कंपनीचे कर्मचारी घेऊ शकतात. जर एखाद्या कंपनीत तुम्ही तात्पुरत्या स्वरुपाची नोकरी करत असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. पॉलिसी घेतल्यानंतर ठराविक दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असतो. या दरम्यान नोकरी गेल्यास लाभ मिळत नाही. याशिवाय खराब कामगिरी किंवा गैरव्यवहारप्रकरणी नोकरी गेल्यास या पॉलिसीची मदत होत नाही. त्याचबरोबर निवृत्तीच्या वयात किंवा निवृत्ती जवळ आल्यास लाभ मिळत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job insurance police help for emi know rmt
First published on: 21-01-2022 at 15:09 IST