इंजिनिअरिंग करत आहात आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या कंपनीत दोनशे रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ECIL ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे.

आवेदन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. ECIL ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ११ ऑक्टोबर आहे. ECILच्या अधिकृत संकेतस्थळ careers.ecil.co.in वरून अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअररिंग मधून पदवी मिळालेली असणे आवश्यक आहे.

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज दाखल केल्यानंतर परिक्षार्थी विद्यार्थांना एक लेखी परिक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांना कागपत्रांसह पडताळणीसाठी बोलावले जाणार आहे.

आणखी वाचा- हेड कॉन्स्टेबल पदाच्या ५५४ जागांची भरती

दोनशे जागा कॉन्ट्रक्ट बेसेसवर असतील. चार महिन्यांसाठी सर्वांची निवड करण्यात येणार आहे. या काळात 20,072 रूपये पगार दिला जाणार आहे. सर्व प्रक्रियेनंतर निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना १५ दिवसांत कामावर रूजू व्हावे लागेल. कामावर रूजू झालेल्या उमेदरांना भारतामधील विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काम करावे लागणार आहे.

इथं करा अर्ज – http://careers.ecil.co.in/advt4019.php
आधिक माहितीसाठी – http://www.ecil.co.in/