भारतीय संसदेत ‘पार्लमेंटरी रिपोर्टर’च्या एकूण २१ पदांची भरती.

(रिक्रूटमेंट ब्रँच, लोकसभा सेक्रेटरिएट)
(अजा – २, अज – २, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ९)
(यातील १२ पदे इंग्रजी आणि ९ पदे हिंदी शाखेतील आहेत.)

पात्रता – (दि. २८ जानेवारी २०२० रोजी)
पदवी उत्तीर्ण आणि शॉर्टहँड स्पीड १६० श.प्र.मि. इंग्रजी किंवा हिंदी.
इष्ट पात्रता – कॉम्प्युटरमधील सर्टिफिकेट कोर्स AICTE/NIELIT मान्यताप्राप्त किंवा
‘ओ’ लेव्हल कोर्स उत्तीर्ण.
(जर १६० श.प्र.मि. शॉर्टहँड स्पीडवाले उमेदवार मिळाले नाहीत तर १४० श.प्र.मि. शॉर्टहँड स्पीड असलेल्या उमेदवारांचा निवडीसाठी विचार केला जाईल.)

वयोमर्यादा – दि. २८ जानेवारी २०२० रोजी ४० वर्षांपर्यंत.
वेतन – दरमहा रु. ९०,०००/- दिले जाईल.

निवड पद्धती –
(१) शॉर्टहँड टेस्ट,
(२) लेखी परीक्षा आणि
(३) मुलाखत या सर्व टेस्ट नवी दिल्ली येथे द्याव्या लागतील. (टेस्टसाठीचे नेमके ठिकाण आणि तारीख अॅडमिट कार्ड जे पात्र उमेदवारांना जारी केले जाईल, त्यात दिलेले असेल.)

(१) शॉर्टहँड टेस्ट – १०० गुणांकरिता
(i) इंग्रजी / हिंदी डिक्टेशन १६० श.प्र.मि. प्रति वेगाने १० मिनिटांसाठी दिले जाईल. ट्रान्स्क्रिप्शनसाठी इंग्रजी शॉर्टहँड टेस्ट – १ तास ३० मिनिटे वेळ दिला जाईल. हिंदी शॉर्टहँड टेस्ट ट्रान्स्क्रिप्शनसाठी १ तास ५५ मिनिटांचा वेळ दिला जाईल.

(ii) हिंदी शॉर्टहँड टेस्टसाठी १४० श.प्र.मि. वेगाने १० मिनिटे डिक्टेशन दिले जाईल आणि ट्रान्स्क्रिप्शनसाठी इंग्रजी शॉर्टहँड १ तास २० मिनिटे आणि हिंदी शॉर्टहँडसाठी १ तास ४५ मिनिटे वेळ दिला जाईल.
(शॉर्टहँड टेस्टमध्ये केवळ ५% चुका मान्य केल्या जातील.)

(२) लेखी परीक्षा –
शॉर्टहँड टेस्टमधील उत्तीर्ण उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविले जाईल. ज्यात पार्ट-ए जनरल अवेअरनेस आणि चालू घडामोडी व पार्ट-बी जनरल इंग्लिश यांवर एकूण प्रत्येकी ५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. एकूण १०० गुण, वेळ ५० मिनिटे. (लेखी परीक्षेतील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत.)

(३) पर्सनल मुलाखत –
लेखी परीक्षेत पात्रता गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.
अर्जाचा नमुना http://www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर Recruitment Advertisement & Notices या लिंकवर दि. २८ जानेवारी २०२० पर्यंत पाहता येईल.