Jupiter In Aquarius 2021: गुरु कुंभ राशीत विराजमान असल्याने ‘या’ राशींना १२८ दिवसांपर्यंत मिळणार फायदा

बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रह २७ नक्षत्रातील पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वी भाद्रपद नक्षत्रांचा स्वामी आहे.

guru-transit-2020
गुरु कुंभ राशीत विराजमान असल्याने 'या' राशींना १२८ दिवसांपर्यंत मिळणार फायदा (फोटो- जनसत्ता)

ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पतीला ज्ञान, शिक्षक, संतान, मोठा भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थळ, धन, दान, पुण्य आणि प्रगतीचा ग्रह मानला जातो. बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रह २७ नक्षत्रातील पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वी भाद्रपद नक्षत्रांचा स्वामी आहे. सध्या गुरु ग्रह कुंभ राशीत असल्याने येत्या १२८ दिवसापर्यंत तिथेच विराजमान असणार आहे. त्यामुळे काही राशींना सकारात्मक प्रभाव असणार आहे.

मेष राशीवरील प्रभाव

मेष राशीला शुभ परिणाम मिळतील.धन लाभ होईल.अध्यात्मिक व धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. तसेच नोकरी,व्यवसायात प्रगती होईल.कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.नवीन वाहन किंवा घर घेण्याचे योगही बनत आहेत.

मिथुन राशीवरील प्रभाव

मिथुन राशीच्या लोकांवरही गुरुची कृपा होईल. लाभ होईल तसेच आर्थिक बाजू भक्कम राहील.नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानासारखा आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. खूप मान-सन्मान मिळेल. प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

Venus Transit 2021: मकर राशीत प्रवेश करणार शुक्र, या ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

तूळ राशीवरील प्रभाव

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फलदायी असणार आहे.नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ शुभ राहील.वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरी, नवीन संधी मिळतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल.

वृश्चिक राशीवरील प्रभाव

वृश्चिक राशीला लाभ होईल, त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम राहील. प्रतिष्ठेत आणि पदात वाढ होईल.नोकरी,व्यवसायात लाभाची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांना शुभ परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. सर्वजण तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.

सिंह राशीवरील प्रभाव

सिंह राशीच्या लोकांनी गुरूची चांगली फळं मिळतील. आर्थिक समस्यांपासून सुटका होईल.नवीन वाहन किंवा घर खरेदीची शक्यता निर्माण होत आहे.कामात यश मिळेल.वैवाहिक जीवन आनंदी राहील.कुटुंबातील सदस्य आणि मित्रांचे सहकार्य मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jupiter is in aquarius these zodiac signs will get benefit for 128 days rmt

ताज्या बातम्या