Rashi Parivartan 2021: नोव्हेंबर महिन्यात गुरू बदलणार आहे राशी, ‘या’ चार राशींना मिळणार आर्थिक लाभ

शनिवार, २० नोव्हेंबर रोजी गुरु ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. काही राशीच्या लोकांसाठी गुरूचा राशी बदल खूप शुभ राहील. या दरम्यान त्यांना आर्थिक लाभ मिळेल. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चार राशी..

rashi-parivartan-1

ज्योतिषशास्त्रात एकूण ९ ग्रहांचा अभ्यास केला जातो. प्रत्येक राशीचा काही ना काही शासक ग्रह असतो. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. २० नोव्हेंबर रोजी गुरु ग्रह राशी बदलेल. शनिवार, २० नोव्हेंबर रोजी गुरु ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. काही राशीच्या लोकांसाठी गुरूचा राशी बदल खूप शुभ राहील. या दरम्यान त्यांना आर्थिक लाभ मिळेल. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चार राशी..

मेष : मेष राशीच्या लोकांना, जे व्यावसायिक आहेत, त्यांना गुरूच्या कुंभ राशीत प्रवेशामुळे खूप फायदा होईल. या राशीच्या अकराव्या घरात गुरू प्रवेश करेल. यामुळे मेष राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात शुभ परिणाम मिळतील. या दरम्यान तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल आणि सर्व रखडलेल्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे.

कर्क : गुरुच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना शिक्षणात चांगले फळ मिळेल. कर्क राशीच्या नोकरदार लोकांच्या पदात वाढ होऊ शकते. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला राहील. या राशीच्या लोकांच्या आर्थिक अडचणी दूर होतील.

कन्या : या महिन्यात बृहस्पति कन्या राशीच्या आठव्या घरात प्रवेश करेल. या घरात बृहस्पति असल्यामुळे तुम्हाला अचानक कुठूनतरी फायदा होऊ शकतो. या काळात कन्या राशीच्या लोकांना सामाजिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करता येईल. गुंतवणुकीसाठीही हा काळ अतिशय अनुकूल मानला जात आहे.

मकर : कुंभ राशीत गुरूच्या प्रवेशामुळे या राशीच्या लोकांच्या बोलण्यात स्पष्टता दिसून येईल. भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा येईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कोठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, गुंतवणुकीच्या बाबतीत या राशीच्या लोकांना अधिक सावध राहावे लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jupiter transit in aquarius on november 20 these zodiac sign gets money prp

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!
ताज्या बातम्या