ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांनी आपलं स्थान बदलल्यानंतर बऱ्याच गोष्टींवर परिणाम होत असतात. कधी सकारात्मक, तर कधी वाईट परिणामही जाणवत असतात. मंगळ आणि केतू वृश्चिक राशीमध्ये १४ डिसेंबर २०२१ रोजी म्हणजेच मंगळवारी एकत्र येणार आहेत. हे दोन्ही ग्रह या राशीत अनुराधा नक्षत्रात एकत्र येणार असल्याने महत्त्वाचं ठरणार आहे. अनुराधा नक्षत्रावर शनि ग्रहाचा अंमल असून शनि मकर राशीचा अधिपती ग्रह आहे. राशी क्रमवारीत मकर दहाव्या स्थानी आहे. यामुळे अध्यात्मिक कार्यात वेगाने वाढ होऊ शकते. सर्वसाधारणपणे मंगळ आणि केतूचा संयोग अर्थ आणि रोजगाराच्या संदर्भात फारसा चांगला मानला जात नाही. समृद्धीमध्ये काही अडथळे दिसू शकतात. मात्र काही राशींवर त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतील.

मिथुन: मिथुन राशी तृतीय स्थानावर विराजमान आहे. या राशीच्या लोकांसाठी मंगळ हा सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. या संयोगात केतूसोबत सहाव्या घरात स्थित आहे. हा काळ व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि उन्नतीसाठी खूप शुभ असणार आहे, मंगळ आणि केतू यांच्या युतीमुळे नोकरीत बढती मिळू शकते. याशिवाय नवीन नोकरीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या काळात तुम्हाला अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे.

Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Shani Nakshatra Gochar On 6th April 2024
३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
mars gochar 2024 mangal transit in pisces these zodiac sign get more profit
१८ महिन्यांनंतर मंगळ मीन राशीत करणार प्रवेश, ‘या’ राशींना अच्छे दिन; धनसंपत्तीत होऊ शकते भरभराट

कर्क: कर्क रास ही जलतत्व रास असून स्त्रीराशी आहे. या राशीत जन्मलेल्या लोकांना प्रवासाची आवड असते. हे लोक आपल्या कामात खूप दक्ष असतात. या राशीच्या लोकांसाठी मंगळ पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. केतू पाचव्या भावात स्थित असेल. अध्यात्मिक कार्यात भाग घेण्यासाठी आणि रुची दाखवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. व्यावसायिक आघाडीवर, या काळात ध्येय साध्य कराल. कामाच्या आधारे तुम्हाला पदोन्नती आणि इतर प्रोत्साहने आणि बक्षिसे मिळू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. मंगळ आणि केतूच्या संयोगाच्या प्रभावाने तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतील.

मकर: या राशीच्या लोकांना आपले काम वेळेवर पूर्ण करणे आवडते. या राशीच्या लोकांसाठी मंगळ हा चौथ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे आणि या संयोगात केतूसोबत अकराव्या भावात स्थित असेल. यामुळे तुम्ही तुमचे काम आणि वचनबद्धता वेळेवर पूर्ण करू शकाल. या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. सध्याच्या कार्यक्षेत्रात तुम्ही तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चांगले संबंध निर्माण करू शकाल. आर्थिक बाजूबद्दल बोलायचे तर, या काळात तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही खुलेपणाने पैसे खर्च कराल.

Makar Rashi 2022: मकर राशीच्या लोकांना शनिची साडेसाती; नव्या वर्षात ‘या’ गोष्टींकडे ठेवाल लक्ष

कुंभ: या राशीचे लोक नवीन शोध आणि संशोधन करण्यात जास्त रस घेतात. याशिवाय काम वेळेत पूर्ण करणेही त्यांना आवडते. कुंभ राशीच्या राशीच्या लोकांसाठी मंगळ हा तिसर्‍या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे आणि केतूच्या संयोगात तो दहाव्या भावात स्थित असेल. परिणामी तुम्ही संशोधन आणि तुमच्या कामात पूर्णपणे समर्पित दिसाल. व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे तर, या काळात तुम्हाला नोकरीमध्ये चांगली वाढ पाहायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला प्रमोशन इत्यादी देखील मिळू शकतात. आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मीन: मीन राशीसाठी मंगळ हा दुसऱ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि केतूच्या संयोगात तो नवव्या भावात स्थित असेल. या राशीच्या लोकांना आध्यात्मिक कारणांमुळे प्रवास करावा लागू शकतो. व्यावसायिक जीवन, नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. यासोबतच बढतीचे जोरदार योग दिसत आहेत. दुसरीकडे, आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, मेहनत आणि कामाच्या जोरावर तुम्हाला पदोन्नती आणि सन्मान मिळेल. या कालावधीत पैसे जमा करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.