बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खान ही अभिनयासह तिच्या फिटनेस आणि चमकदार त्वचेसाठी ओळखली जाते. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नुकतेच करिनाच्या योगा प्रशिक्षक, योगा तज्ज्ञ रूपल सिध खुलासा केला की, ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज ३० ते १०८ सूर्यनमस्कार घालते. योगा तज्ज्ञ रूपल सिध यांनी स्पष्ट केले की, वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार अत्यंत प्रभावी आहे. प्रत्येक आठवड्याला सूर्यनमस्कार घालण्याची संख्या हळू हळू ३०-६०-९० आणि मग१०९पर्यंत वाढूव शकता.
योगा तज्ज्ञ रुपल यांनी दावा केला की, तिच्या मार्गदर्शनात अभिनेत्री करिनाने ५० पासून हळू हळू वाढवत १०८ सूर्यनमस्कार घातले होते ज्यामुळे करिनाला खूप फायदा झाला. पण प्रश्न असा आहे की, एका दिवसात १०८ सूर्यनमस्कार घालणे सुरक्षित आहे का? त्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते का? तज्ज्ञ आणि योग प्रशिक्षकांचे याबाबत काय मत आहे आणि फिटनेसचा नक्की फॉर्म्युला काय आहे हे जाणून घ्या.
फिट राहण्यासाठी दिनक्रम कसा असावा
तज्ज्ञांनी इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये स्पष्ट केले की, वजन कमी करण्यासाठी रोज १०हजार पावले चालावे. दिवसभर ६ वेळा थोडा -थोडा आहार घ्यावा,वेट ट्रेनिंगमुळे स्नायू मजबूत करावे आणि दिवसभरात कमीत कमी ३ लीटर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते जर तुम्हाला तुमच्या शरीरातील चरबी कमी करायची असेल तर सकाळी हेल्दी फॅट्सचे सेवन करा.रोज ४५ मिनिटे योगा आणि व्यायाम करा. रोज जेवल्यानंतर चालायला जा. तंदरुस्त राहण्यासाठी योग्य आहार आणि ८ तासांची झोप पूर्ण करणे आवश्यक आहे.
१०८ सूर्यनमस्कार घालणे सर्वांसाठी शक्य आहे का?
कंसल्टेंट डाइटीशिअन आणि फिटनेस एक्सपर्ट गरिमा गोयल यांच्या मतानुसार,”सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे, ज्यामुळे ताकद, लवचिकता, संतुलन आणि हृदयाचे आरोग्य (Cardiovascular fitness) सुधारते. तथापि, दररोज १०८ सूर्यनमस्कार करणे ही गरज नसून, ते एक शारीरिक आणि मानसिक आव्हान आहे. त्यांनी सांगितले की,”सूर्यनमस्कारांची संख्या सावधगिरीने वाढवली पाहिजे. ज्याप्रमाणे स्ट्रेंथ ट्रेनिंग शरीराला हा ताकदीचा व्यायाम करण्यासाठी वेळ देतो, त्याचप्रमाणे ३० ते ६०, नंतर ९० आणि शेवटी १०८ सूर्यनमस्कार केल्याने स्नायूंची ताकद, सहनशक्ती आणि हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. यामुळे दुखापतीचा धोकाही कमी होतो.”
घाई केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात
गरिमा गोयल यांनी स्पष्ट केले की, सूर्यनमस्कारांची संख्या वाढवणे हे व्यक्तीची शारीरिक क्षमता, वय, लवकर सावरण्याची क्षमता आणि योग्य तंत्रावर अवलंबून असते. जे लोक आरामात २०-३० सूर्यनमस्कार करू शकतात, ते दर आठवड्याला काही फेऱ्या वाढवू शकतात. तथापि, नवशिक्यांसाठी, अचानक खूप जास्त सूर्यनमस्कार केल्याने मनगट, खांदा आणि पाठदुखी किंवा अतिरिक्त थकवा येऊ शकतो.
एका सूर्यनमस्कारादरम्यान, खांदे, छाती, पाठ, पोट, नितंब आणि पाय यांसारख्या शरीराच्या अनेक भागांतील स्नायू सक्रिय होतात. त्यामुळे, १०० पेक्षा जास्त वेळा त्याची पुनरावृत्ती केल्याने शरीरावर खूप ताण येतो, ज्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक ठरते.
सूर्यनमस्काराचा फायदा घेण्यासाठी संख्यांची सातत्यता अधिक आवश्यक आहे का?
गरिमा गोयल म्हणतात की, “फिटनेसचे ध्येय केवळ संख्या पूर्ण करणे नाही. संशोधनातून असे दिसून आले आहे की, जास्त पुनरावृत्तीपेक्षा योग्य तंत्र आणि नियमित सराव अधिक फायदेशीर ठरतो. अनेक लोकांसाठी, १२ ते २४ तास नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने लक्षणीय फायदे मिळू शकतात.”
१०८ पर्यंत सूर्यनमस्कार करण्याचा फॉर्म्युला
- आठवडे १-२: २४ ते ३० सूर्यनमस्कार
- आठवडे ३-४: ४० ते ५० सूर्यनमस्कार
- आठवडे ५-६: ६० ते ७५ सूर्यनमस्कार
- आठवडे ७-८: ९० किंवा अधिक सूर्यनमस्कार
यानंतर, शरीर पूर्ववत झाल्यास आणि तंत्र योग्य राहिल्यास १०८ सूर्यनमस्कारांचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, कोणतेही फिटनेस आव्हान ही एक परीक्षा नसून एक प्रशिक्षण प्रक्रिया असली पाहिजे.
