ज्यावेळी फिटनेसचा विषय येतो त्याचवेळी सर्वांना बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आठवते. तसंच प्रेग्नंसीनंतर सुद्धा तिच्या झिरो फिगरने सर्वांना अचंबित करून सोडलं. तिच्याप्रमाणेच अनेकांना सध्याच्या वर्क फ्रॉम होममुळे चरबी वाढल्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. शरीरावरील वाढलेल्या चरबीमुळे सौंदर्य बिघडून जातं. अभिनेत्री करीना कपूरच्या सौंदर्यामागचं रहस्य नक्की काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. म्हणूनच करीनाच्या फिटनेस कोच रुजुता दिवेकर यांनी तुमच्यासाठी फिटनेससाठीच्या तीन स्वस्त गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊयात.

अभिनेत्री करीना कपूर हिच्या फिटनेस कोच रुजुता दिवेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या टिप्स शेअर केल्या आहेत. जे सध्याच्या वर्क फ्रॉम होम करत आहेत, अशा व्यक्तींसाठी या टिप्स खूपच उपयुक्त आहेत. तसंच जे वर्क फ्रॉम होम करत नाहीत पण अॅक्टिव्हीटी सुद्धा कमी असते अशांसाठी सुद्धा फिटनेस कोच रुजुता दिवेकर यांनी टिप्स शेअर केल्या आहेत. यात त्यांनी अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होतील अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत. पाहूयात नक्की काय आहेत त्या तीन स्वस्त गोष्टी…

With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

हंगामी फळे

जर घरून काम केल्यास तुमची पचन समस्या वाढत आहे, गोड खाण्याची लालसा वाढतेय, तसंच कंबरेचा आकार सुद्धा वाढतोय, तर या समस्या अगदी सहज दूर करता येतात. सर्वप्रथम तुमच्या आहारात ताज्या फळांचा समावेश करण्याचा सल्ला रुजुता यांनी दिलाय. हंगामी फळं जे आपल्याला अगदी सहज आणि स्वस्त उपलब्ध होतात, ही फळं खालल्याने आपल्या शरीरातील हेल्दी बॅक्टेरियांना पोषण मिळतं. या व्यतिरिक्त, आपल्याला फायबर देखील मिळतात. यामुळे तुमचे अन्न सहज पचन होतं आणि तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतात. जर तुम्हाला बसताना सुस्त वाटत असेल आणि बसून म्हातारपण आल्यासारखं वाटत असेल तर तुमच्यासाठी अँटिऑक्सिडंट्स खूप महत्वाचे आहेत.

मूठभर चणे

रुजूता यांनी दिलेली आणखी एक टिप म्हणजे आहारात मूठभर चने समाविष्ट करा. बसताना शरीराचा खालचा भाग वापरला जात नाही. जेव्हा शरीरावर गुरुत्वाकर्षण शक्ती नसते तेव्हा हाडांची खनिज घनता वाया जाते. यामुळे तुमची चरबी वाढते. रुजुता यांनी यासाठी सोपा उपाय सांगितला आहे. तो म्हणजे हरभरा खाणे. भाजलेले चणे आरोग्यासाठी खूप चांगले असतात. दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर तुम्हाला मिठाई खावीशी वाटत असेल तर गूळ-हरभरा हा उत्तम पर्याय आहे.

तीन चमचे तूप

तिसरी गोष्ट जी रुजुतांनी आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला तो म्हणजे तूप. तुपात शॉर्ट चेन फॅटी अॅसिड असतात. यामुळे पचन सुधारतं. कंबर आणि मांडीची चरबी कमी होते. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात तूप खा. तूप डोळ्यांवरील ताण कमी करते. जर तुम्ही संगणकावर काम करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.