How To Clean And Wash Blazer : ऑफिसमध्ये एखादी मिटिंग असेल किंवा लग्न समारंभात अनेकदा ब्लेझर आवर्जून घातले जाते. कोणत्याही व्यावसायिक ड्रेसचा ब्लेझर एक महत्त्वाचा भाग असतो. पण, त्यांना वारंवार ड्राय क्लीन करणे हे खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे. तसेच त्यांना प्रत्येक वेळी ड्राय क्लीन केल्याने त्यांच्या फॅब्रिकची गुणवत्तादेखील खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत ब्लेझर जास्त काळ स्वच्छ आणि सुगंधित कसा ठेवायचा, असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? (How To Clean And Wash Blazer ).

तर या समस्येचा सामना करावा लागत असेल तर काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला मदत करू शकतात.

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Plastic Chair Cleaning Tips
काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ

१. सूर्यप्रकाशात ठेवा

ब्लेझर स्वच्छ, दुर्गंधीमुक्त ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो वेळोवेळी सूर्यप्रकाशात ठेवा. कधीकधी ओलावा, घामामुळे ब्लेझरमधून एक विचित्र वास येऊ लागतो. तो दुर्गंध काढून टाकण्यासाठी ब्लेझर उलटा करून उन्हात पसरवून ठेवा. पण लक्षात ठेवा की, ब्लेझर जास्त काळ थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका, कारण यामुळे फॅब्रिकचा रंग फिका होऊ शकतो.

२. बेकिंग सोडा स्प्रे

जर ब्लेझरला वास येत असेल तर बेकिंग सोडा वापरा. यासाठी पाण्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळून त्यावर स्प्रे करा किंवा ब्लेझरवर हलकेच शिंपडा. फवारणी केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या आणि नंतर स्वच्छ ब्रश किंवा व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा. बेकिंग सोडा वास शोषून घेण्यासाठी आणि कपड्यांना ताजेपणा देण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो (How To Clean And Wash Blazer).

३. इस्त्री करताना काळजी घ्या

इस्त्री थेट ब्लेझरवर वापरू नका. त्याऐवजी पाण्यात थोडे डिटर्जंट मिसळा, नंतर त्यात स्वच्छ कापड बुडवा आणि ते पिळून घ्या आणि ब्लेझरवर पसरवा. नंतर इस्त्री फिरवा. यामुळे ब्लेझरवरील डाग टाळता येतील आणि कापडाची चमकही कायम राहील.

हेही वाचा…Eggs For Winter Skincare : हिवाळ्यात त्वचेसाठी अंड्याचा करा उपयोग आणि त्वचेची घ्या काळजी; वाचा, ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे

४. फॅब्रिक फ्रेशनर वापरा

आजकाल बाजारात अनेक प्रकारचे फॅब्रिक फ्रेशनर उपलब्ध आहेत, जे कपड्यांना ताजेपणा आणि चांगला सुगंध देतात. त्यांना ब्लेझरवर हलके स्प्रे करा आणि काही काळ लटकवून ठेवा, यामुळे ब्लेझर केवळ दुर्गंधीमुक्त होणार नाही तर त्याला सुगंध येईल.

५. अशा प्रकारे साफ करा डाग

जर ब्लेझरवर डाग पडला असेल तर तो पूर्णपणे धुण्याची गरज नाही. सौम्य साबणाच्या पाण्यात स्वच्छ कापड किंवा कापूस भिजवा आणि डाग हलक्या हाताने घासून घ्या. लक्षात ठेवा की, डाग असलेली जागा जोरात घासू नका अन्यथा कापड खराब होऊ शकते. यानंतर ब्लेझरला कोरड्या कपड्याने हलके दाबा, जेणेकरून जास्तीचे पाणी बाहेर येईल (How To Clean And Wash Blazer).

६. हँड स्ट्रीमर वापरा

ब्लेझर स्वच्छ आणि ताजे ठेवण्यासाठी हँड स्ट्रीमर हा एक उत्तम पर्याय आहे. हे ब्लेझरमधून केवळ सुरकुत्याच काढून टाकत नाही तर हलका गंध आणि बॅक्टेरियादेखील काढून टाकण्यास मदत करते. हे वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि फॅब्रिकला हानी पोहोचवत नाही.

७. हलक्या हाताने स्वच्छ करा

ब्लेझर दीर्घकाळ नवीन ठेवण्यासाठी हलकी आणि मऊ साफसफाईची पद्धत वापरा. यासाठी ब्रश किंवा जास्त पाणी वापरू नका.

ब्लेझरची योग्य काळजी घेणे का आवश्यक आहे (How To Clean And Wash Blazer )

ब्लेझर हे दीर्घकाळ चांगले वापरता येतात, त्यामुळे त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ब्लेझर नेहमी स्वच्छ, सुगंधित ठेवा. या सात टिप्समुळे तुम्हाला ब्लेझर वारंवार ड्राय क्लीनिंगची गरज भासणार नाही आणि पैशांचीही बचत होईल, त्यामुळे पुढच्या वेळी तुमच्या ब्लेझरवर डाग पडल्यास किंवा थोडासा वास आल्यावर हे सोपे उपाय करून पाहा.

Story img Loader