Kidney stone natural remedy: किडनी स्टोन ही एक वेदनादायक समस्या आहे जी जेव्हा मूत्रपिंडात खनिजे आणि स्फटिक जमा होतात, तेव्हा एक घन दगड तयार होतो. किडनी स्टोनमुळे येणारी वेदना कधीकधी इतकी तीव्र असते की त्या व्यक्तीला त्वरित उपचाराची गरज भासते. जेव्हा कॅल्शियम आणि ऑक्झलेटसारखे घटक तुमच्या लघवीत जास्त प्रमाणात जमा होतात आणि तुमच्या मूत्रपिंडामध्ये एकत्र चिकटू लागतात तेव्हा ते छोट्या कठीण गाठीसारखे दिसतात. काही लोक म्हणतात की, मूत्रपिंडातील खडा बाहेर पडणे ही त्यांना आतापर्यंत जाणवलेली सर्वांत वाईट वेदना आहे. कधी कधी मोठे खडे स्वतःहून हलत नाहीत आणि डॉक्टरांना हस्तक्षेप करून ते काढून टाकावे लागतात.
पण, एक चांगली बातमी अशी आहे की, तुम्ही काय खाता आणि तुमचा दिवस कसा जातो यामध्ये बदल करून, तुम्ही मूत्रपिंडात खडा होऊ नये साठी बरेच काही करू शकता. एम्स दिल्ली येथील न्यूरोलॉजिस्ट व जनरल फिजिशियन डॉ. प्रियंका सेहरावत, ज्यांचे इंस्टाग्रामवर “डॉकप्रियंकशेहरवत” हे नाव आहे, त्यांनी अलीकडेच लोकांना किडनी स्टोन टाळण्यासाठी मदत करण्यासाठी तीन सोप्या आहार टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांचा सल्ला सोपा, विज्ञानावर आधारित आहे आणि प्रत्यक्ष वास्तविक जीवनाशी निगडित आहे.
तर, किडनी स्टोन म्हणजे नेमके काय?
ते खनिजांचे घट्ट गठ्ठे असतात, सहसा कॅल्शियम ऑक्झलेट, जे एका किंवा दोन्ही मूत्रपिंडांत जमा होतात. कधी कधी ते वाळूच्या कणाएवढे लहान असतात; तर कधी कधीते गारगोटीइतके मोठे किंवा त्याहूनही मोठे असतात. जेव्हा ते हालचाल करतात तेव्हा त्यामुळे तीव्र वेदना, लघवीच्या समस्या, संसर्ग किंवा अडकल्यास शस्त्रक्रिया करण्याची वेळदेखील येऊ शकते.
भारतीय धर्मात तुळशीला वेगळे स्थान दिले जाते. हिंदूंच्या घरात त्याची पूजा केली जाते आणि ती पूजा साहित्य म्हणून किंवा कोणत्याही पूजेतही वापरली जाते. पण या सर्वांसोबतच, तुळशी तिच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखली जाते. त्यात आढळणाऱ्या पोषक तत्त्वांबद्दल बोलायचे झाले तर, तुळशीमध्ये जीवनसत्त्वे, सोडियम, लोह, कॅल्शियम असे अनेक फायदेशीर घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तुळशी सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुळशीचे सेवन केल्याने मूत्रपिंडातील खड्याची समस्या दूर होण्यासदेखील मदत होते. चला जाणून घेऊया तुळशीचे सेवन कसे करावे आणि मूत्रपिंडातील खड्याची समस्या दूर करण्यासाठी ते कसे फायदेशीर आहे.
जर तुम्हाला मूत्रपिंडात खड्यांची समस्या असेल, तर तुम्ही तुळशीच्या चहाचे सेवन करू शकता. तुळशीच्या चहामध्ये अॅसिटिक अॅसिड आढळते. हा एक असा घटक आहे, जो मूत्रपिंडातील खड्यामुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत करू शकते. त्याच वेळी हा घटक मूत्रपिंडातील लहान खडा विरघळण्यास मदत करू शकतो. म्हणजेच जर तुमच्या खड्याचा आकार खूप मोठा नसेल, तर हा घटक तो विरघळवण्यास आणि काढून टाकण्यास मदत करू शकतो. तुळशीचे अँटी-लिथियासिस गुणधर्म खड्याचा आकार कमी करण्यास आणि आकुंचन करण्यास, तसेच त्यांची निर्मिती रोखण्यासही मदत करतात.
मीठ कमी करा आणि सायट्रेट असलेले अधिक पदार्थ खा
तुमचा धोका कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे कमी मीठ खाणे. जास्त मीठ तुमच्या मूत्रात अतिरिक्त कॅल्शियम टाकते आणि ते खडे तयार होण्याचे एक मोठे कारण आहे.
त्याच वेळी डॉ. सेहरावत म्हणतात की, लिंबू, संत्री, मोसंबी व किवी यांसारखी लिंबूवर्गीय फळे जास्त खा. त्यामध्ये सायट्रेट भरपूर असते, जे कॅल्शियमचे रूपांतर मूतखड्यामध्ये होऊ नये यासाठी प्रतिबंध करते. ते लहान खडे मोठे होण्यापूर्वी तोडण्यासदेखील मदत करते. प्यायच्या पाण्यात थोडे लिंबू पिळणे किंवा लिंबूवर्गीय फळे खाणे हा अधिक प्रमाणात सायट्रेट मिळविण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. पालक, बीट, गोड बटाटे आणि साखरेची पेये किंवा ज्यूस यांसारखे ऑक्झलेट जास्त असलेले पदार्थ थोडे कमी करण्याचा सल्ला डॉ. सेहरावत देतात. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले, तर तुम्हाला मूतखडे होण्याची शक्यता जास्त असते.
भरपूर पाणी प्या – दिवसातून किमान २.५ लिटर
पुरेसे पाणी प्या. डॉ. सेहरावत म्हणतात की दिवसातून किमान २.५ लिटर (सुमारे १०-१२ कप) द्रव प्या आणि जर तुम्हाला खूप घाम येत असेल किंवा बाहेर उष्णता असेल, तर त्याहून अधिक पाणी प्या. जेव्हा तुम्ही हायड्रेटेड असता तेव्हा तुमची लघवी पातळ होते. त्यामुळे खनिजे एकत्र जमत नाहीत आणि खडे तयार होत नाहीत. कारण- तुमची लघवी प्रवाही राहते आणि खडे तयार करणारी खनिजे तयार होत नाहीत. साधे पाणी परिपूर्ण आहे; परंतु जर तुम्हाला अधिक चव आणि नैसर्गिक सायट्रेट बूस्ट हवे असेल, तर तुम्ही लिंबू पाणी किंवा नारळ पाणी पिऊ शकता.
