Kidney Health : रक्त तपासणीचे अहवाल अनेकदा अनोळखी संज्ञांच्या कोड्यांसारखे वाटतात. पण, दोन निर्देशक(मार्कर्स) खूप अर्थपूर्ण आहेत: युरिक ॲसिड आणि क्रिएटिनिन. ते एकाच अहवालात, अनेकदा ‘किडनी पॅनेल’च्या खाली दर्शवलेले असतात, त्यामुळे ते एकच गोष्ट मोजतात असे गृहीत धरणे सोपे असते. पण तसे नाही.

हे दोन आकडे शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया दर्शवतात. एक किडनी किती चांगल्या प्रकारे रक्त शुद्ध करते करत आहे याबद्दल सांगतो. तर दुसरा, शरीर चयापचय, आहार आणि टाकाऊ पदार्थ कसे हाताळत आहे याबद्दल संकेत देतो. दोघांपैकी प्रत्येकाकडे स्वतंत्रपणे पाहण्यापेक्षा, दोघांना एकत्रिपणे पाहिल्यास आरोग्याचे अधिक स्पष्ट चित्र मिळते.

याबाबत टीओआयला माहिती देताना डॉ. अंकुर सिंघल स्पष्ट सांगतात, “जेव्हा आपण लॅब चाचणीचे रिझल्ट पाहतो, तेव्हा अनेकदा दोन नावे समोर येतात: युरिक ॲसिड आणि क्रिएटिनिन. जरी दोन्ही तुमच्या किडनीशी संबंधित असले तरी, ते प्रत्यक्षात तुमच्या आरोग्याबद्दल दोन खूप वेगळ्या गोष्टी सांगतात.”

क्रिएटिनिन: किडनीच्या कार्याची तपासणी

क्रिएटिनिन हा एक टाकाऊ पदार्थ आहे जो स्नायू ऊर्जा वापरताना तयार होतो. शरीर दररोज एका स्थिर गतीने ते तयार करते. निरोगी किडनी ते लघवीद्वारे फारशा चढ-उताराशिवाय गाळून बाहेर टाकतात. म्हणूनच डॉक्टर क्रिएटिनिनला किडनीच्या कार्याचा एक विश्वसनीय निर्देशक मानतात.

डॉ. सिंघल हे सोप्या भाषेत सांगतात, “क्रिएटिनिनला तुमच्या किडनीचा ‘स्पीडोमीटर’ समजा. हा स्नायूंच्या विघटनातून तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे, जो निरोगी किडनी अत्यंत स्थिर गतीने गाळून बाहेर टाकतात.”

जेव्हा क्रिएटिनिनची पातळी वाढते, तेव्हा अनेकदा हे संकेत देतो की किडनी कार्यक्षमतेने टाकाऊ पदार्थ गाळून बाहेर टाकत नाही. हे डिहायड्रेशन, काही विशिष्ट औषधे किंवा किडनीच्या मूळ आजारामुळे होऊ शकते. महत्त्वाचा मुद्दा हा आहे: क्रिएटिनिन हे कार्य दर्शवते, जीवनशैली नाही.

युरिक ॲसिड: चयापचय (Uric acid: metabolism)

युरिक ॲसिड हे प्युरिन्सच्या विघटनातून तयार होते. हे पदार्थ लाल मांस, सीफूड, अल्कोहोल आणि अगदी मसूरसारख्या काही आरोग्यदायी पदार्थांमध्ये आढळतात. क्रिएटिनिनच्या विपरीत, युरिक ॲसिडची पातळी आहार, हायड्रेशन (पाणी पिणे) आणि चयापचय क्रियेनुसार कमी-जास्त होऊ शकते.

डॉ. सिंघल स्पष्ट करतात, “दुसरीकडे, युरिक ॲसिड हे शरीरातील मेटाबॉलिझम (चयापचय) नियंत्रित करणारे रासायनिक संदेशवाहक (chemical signals)आहे. जेव्हा तुमचे शरीर विशिष्ट अन्न आणि पेयांमध्ये आढळणाऱ्या प्युरिन्सचे विघटन करते, तेव्हा ते तयार होते.”

उच्च युरिक ॲसिडचा अर्थ नेहमीच किडनीचा त्रास असा होत नाही. त्याऐवजी, ते अनेकदा जीवनशैलीच्या सवयीकडे इशारा करते. अपुरे हायड्रेशन, साखरेचे जास्त सेवन किंवा चयापचय क्रियेतील समस्या या सर्वांची भूमिका असू शकते.

‘रिसर्च गेट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातील माहितीनुसार, शहरी लोकसंख्येमध्ये वाढत्या युरिक ॲसिडच्या पातळीचा संबंध मेटाबॉलिक सिंड्रोमच्या वाढत्या दरांशी जोडली गेली आहे.

या दोन निर्देशक(मार्कर्स)मध्ये अनेकदा गोंधळ का होतो? (Why is there often confusion between these two markers?)

दोन्ही निर्देशक(मार्कर्स)चा संबंध किडनीशी आहे, त्यामुळे हा गोंधळ समजण्यासारखा आहे. परंतु त्यांच्या भूमिका खूप वेगळ्या आहेत.

क्रिएटिनिन एका सोप्या प्रश्नाचे उत्तर देते: किडनी योग्यरित्या टाकाऊ पदार्थ बाहेर टाकत आहेत का?

युरिक ॲसिड एक व्यापक प्रश्न विचारते: चयापचय आणि आहारातून निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांचे शरीर कसे व्यवस्थापन करत आहे?

डॉ. सिंघल हा फरक स्पष्टपणे मांडतात, “हे निर्देशक(मार्कर्स) समजून घेणे म्हणजे भीती बाळगणे नव्हे, तर स्पष्टता मिळवणे होय. एक आपल्याला किडनी टाकाऊ पदार्थ किती चांगल्याप्रकारे बाहेर टाकत आहे हे सांगतो, तर दुसरा आपल्याला आपल्या शरीरातील अंतर्गत रसायनशास्त्राची (Chemistry) एक झलक देतो.”

केवळ एकाच निनिर्देशक(मार्कर्स)कडे पाहिल्यास अपूर्ण निष्कर्ष निघू शकतात. एकत्रितपणे, ते अधिक संतुलित दृष्टिकोन तयार करतात.

जेव्हा पातळी वाढते: शरीर काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे (When levels rise: What the body is trying to tell you)

क्रिएटिनिनची वाढलेली पातळी अनेकदा मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी झाल्याचे दर्शवते. हे तात्पुरते असू शकते, जसे की निर्जलीकरण, किंवा अधिक गंभीर असू शकते, जसे की दीर्घकालीन मूत्रपिंडाचा रोग(Chronic Kidney Disease).

दुसरीकडे, युरिक ॲसिडची उच्च पातळी स्फटिकांच्या( युरीक अॅसिडचे खडे) निर्मितीस कारणीभूत ठरू शकते. हे स्फटिक सांध्यांमध्ये स्थिरावू शकतात आणि संधिवाताचा एक वेदनादायक प्रकार असलेल्या सांध्याच्या दुखण्याचे कारण ठरू शकतात.

एनआयएचने (NIH) जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये, विशेषतः विकसनशील देशांमध्ये, हायपरयुरिसेमिया(Hyperuricemia)सह, सातत्याने वाढ होत असल्याचेही नमूद केले आहे.

म्हणून, क्रिएटिनिन कार्यक्षमतेचे संकेत देते, तर युरिक ॲसिड असंतुलनाचे संकेत देते.

दोन्ही निर्देशकांचे व्यवस्थापन: ही एकच पद्धत नाही (Managing both Marker: This is not the only method)

क्रिएटिनिनचे व्यवस्थापन हे किडनीच्या आरोग्याचे रक्षण करण्याविषयी आहे. यामध्ये हायड्रेटेड राहणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि मधुमेहाचे व्यवस्थापन करणे यांचा समावेश होतो. युरिक ॲसिडचे व्यवस्थापन जीवनशैलीच्या निवडींवर अधिक लक्ष केंद्रित करते. जास्त प्युरिन असलेले पदार्थ कमी करणे, मद्यपान मर्यादित करणे आणि हायड्रेशन सुधारल्याने लक्षणीय फरक पडू शकतो.

डॉ. सिंघल प्रतिबंधावर भर देतात, “दोन्हीवर लक्ष ठेवल्याने आपल्याला परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते. चला, आपल्या किडनींना आनंदी ठेवूया आणि आपले आरोग्य संतुलित ठेवूया!”

या दृष्टिकोनात एक शहाणपण आहे. आजारावर प्रतिक्रिया देण्याऐवजी, ते लवकर जागरूकता निर्माण करण्यास प्रोत्साहन देते.

साम्य: जिथे दोन्ही निर्देशक एकत्र येतात. (Similarities: Where Both Markers come together)

अशा काही परिस्थिती असतात जिथे दोन्ही निर्देशक(मार्कर) एकत्र वाढतात. किडनीचा गंभीर आजार हे त्यापैकीच एक आहे. जेव्हा किडनीला त्रास होतो, तेव्हा ती क्रिएटिनिन आणि युरिक ॲसिड दोन्ही प्रभावीपणे बाहेर टाकण्यात अयशस्वी ठरते.

हे साम्य महत्त्वाचे आहे. यामुळे डॉक्टरांना कळते की,”चयापचयाची समस्या किडनीच्या समस्येत कधी बदलत आहे.”

केवळ एकच लॅब व्हॅल्यू क्वचितच संपूर्ण चित्र स्पष्ट करते. वय, स्नायूंचे प्रमाण, हायड्रेशन आणि अलीकडील जेवण यांसारखे घटक निकालांवर परिणाम करतात. म्हणूनच डॉक्टर केवळ एकाच अहवालावर अवलंबून राहत नाहीत. ते कालांतराने दिसणारे बदल, लक्षणे आणि इतर निर्देशका(मार्कर्स)चा अभ्यास करतात.