Patharchatta Remove kidney stone : आयुर्वेदाच्या खजिन्यात अशा अनेक जडीबुटी आहेत, ज्यांचा वापर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून केला जातो. आजकाल आजारांवर उपचार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा लागतो. अशात वनस्पतींचा वापर करून तुम्ही अनेक समस्या दूर करू शकता. अशीच एक वनस्पती म्हणजे पानफुटी. आयुर्वेदात पानफुटी विविध औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते. त्याची पाने शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. परंतु, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि अनेक आरोग्य समस्या दूर करण्यास प्रभावी आहे. पानफुटी मूत्रपिंडातील खड्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते.
मूत्रपिंडातील दगड काढून टाका
किडनी स्टोन काढून टाकण्यासाठी प्रामुख्याने पानफुटीचा वापर केला जातो. त्याच्या पानांचा रस नियमितपणे प्यायल्याने खडे विरघळतात आणि ते लघवीद्वारे बाहेर पडू शकतात. हा रस किडनीला डिटॉक्सिफाय करतो आणि त्यांना पुन्हा तयार होण्यास प्रतिबंध करतो. पानफुटीच्या पानांच्या मदतीने किडनी स्टोन तर बाहेर पडतोच, सोबतच त्याच्या नियमित सेवनाने शरीरातील विषाक्त पदार्थही बाहेर पडतात, ज्यामुळे तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो.
सूज आणि वेदनांपासून आराम
खडे तोडणाऱ्या या वनस्पतीमध्ये नैसर्गिक दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे शरीराच्या कोणत्याही भागात होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्याची पाने संधिवात, दुखापत किंवा अंतर्गत जळजळ यांसारख्या त्रासांमध्येही खूप फायदेशीर ठरू शकतात.
जलद बऱ्या होणाऱ्या जखमा
या पानांची पेस्ट लावल्याने जखमा, भाजणे आणि फोडांपासून आराम मिळतो. त्याचे जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म जलद बरे होण्यास मदत करतात आणि संसर्ग टाळतात.
किडनी स्टोनसाठी कसे सेवन कराल?
एक ग्लासभर कोमट पाणी घ्या. पानफुटीची दोन ते तीन पाने चावून खा आणि वरून पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी हा उपाय करावा. हवे असल्यी तुम्ही या पानांचा रस काढू शकता. त्यात चिमूटभर काळी मिरी पावडर टाका आणि त्याचं नियमित सेवन करा. तसेच या पानांचा तुम्ही काढाही बनवू शकता. त्यासाठी साधारण अर्धा लिटर पाण्यात पानफुटीची १० ते १२ पाने टाकून उकडून घ्या. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा त्याचं सेवन करा. दिवसातून दोनदा या पाण्याचे सेवन करा. त्यात हवे तर तुम्ही चिमूटभर मीठ टाका.
पानफुटीचे इतर फायदे
वेदना होते दूर
पानफुटी ही वनस्पती एका पेनकिलरसारखे काम करते. अनेकदा अपचन आणि गॅसमुळे पोटात दुखते. पानफुटीच्या पानांमध्ये ही समस्या दूर करण्याची क्षमता आहे. त्यासाठी त्याच्या पानांच्या रसामध्ये चिमूटभर सुंठ पावडर टाकून, त्या रसाचे सेवन करावे. पोटदुखी लगेच दूर होईल.
उच्च रक्तदाबावर नियंत्रण
एका संशोधनानुसार, पानफुटीच्या पानांच्या मदतीने उच्च रक्तदाबावरही नियंत्रण मिळविता येऊ शकते.त्यासाठी प्रथम पानफुटीची पाने धुऊन स्वच्छ करून घ्या. नंतर ती पाने बारीक करून, त्यांचा रस काढा. एक ग्लासभर पाण्यात त्या रसाचे पाच थेंब टाकून, त्या पाण्याचे सेवन करा. दिवसातून दोनदा हा उपाय केल्यास तुम्हाला उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
