kidney stone home remedies: किडनी स्टोन ही एक समस्या आहे, जी किडनी किंवा मूत्रमार्गात कुठेही होऊ शकते. किडनी स्टोन होण्याची अनेक कारणे आहेत, जसे की कमी पाणी पिणे, लघवीमध्ये रसायनांचे प्रमाण वाढणे, शरीरात खनिजांची कमतरता, डिहायड्रेशन, व्हिटॅमिन डीचे जास्त प्रमाण आणि जंक फूडचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोन होऊ शकतात. ५ मिमीपेक्षा कमी आकाराचे किडनी स्टोन लघवीद्वारे शरीराबाहेर सहजपणे जाऊ शकतात.

जर खडा ५ मिमीपेक्षा मोठा असेल, तर तो मूत्रमार्गात अडथळा निर्माण करू शकतो, ज्यामुळे पाठदुखी आणि उलट्या होऊ शकतात. योग्य आहाराचे पालन केल्यास मूत्रपिंडातील खड्यांवर सहज उपचार करता येतात. पतंजलीचे संस्थापक व प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, मूत्रपिंडातील स्टोनशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया अशा काही पदार्थांबद्दल, ज्यांचे सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या टाळता येते.

तुळशीचे सेवन करा:

तुळशीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. मुतखड्याचा त्रास असलेल्यांनी तुळशीचे सेवन करावे. दररोज ५-१० तुळशीची पाने चावल्याने मुतखड्याची लक्षणे दूर होतात.तुळशीतील अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड आणि विविध आवश्यक तेले दगड फोडतात आणि मूत्रमार्गे बाहेर टाकतात. वेदना कमी करण्यासाठी तुळस खूप प्रभावी आहे.

डाळिंबाचा रस सेवन करा:

डाळिंबाचा रस दररोज सेवन केल्याने किडनी स्टोन टाळता येतो. डाळिंबातील पोटॅशियम किडनी स्टोन निर्माण करणाऱ्या खनिज क्रिस्टल्सची निर्मिती रोखण्यास मदत करते. डाळिंबातील अल्कधर्मी गुणधर्मदेखील किडनी स्टोन तयार होण्यापासून रोखण्यास मदत करतात. त्याचे सेवन केल्याने लघवीची आम्लता टिकून राहण्यास मदत होते. किडनी स्टोन असलेल्यांनी त्यांच्या आहारात डाळिंबाचा रस समाविष्ट करावा.

जास्त पाणी प्या:

जर तुम्हाला किडनी स्टोन असेल, तर तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवा. दररोज भरपूर पाणी प्यायल्याने किडनी स्टोनच्या वेदना आणि अस्वस्थतेपासून आराम मिळतो. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी किडनीचा भार कमी होण्यास मदत होते.

खजूर

मोठ्या प्रमाणात खजूर खाणे किडनी स्टोनपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. रात्रभर पाण्यात भिजवलेल्या फायबरयुक्त खजूर खाल्ल्याने किडनी स्टोनपासून मुक्तता मिळू शकते.

काकडी खाल्ल्याने किडनी स्टोन कसा रोखता येतो?

काकडी हे एक असे फळ आहे, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि पाण्याची भरपाई करण्यास मदत करते. मूत्रपिंडातील खड्यांचा त्रास असलेल्यांनी काकडीचे सेवन करावे. जर खड्याचा आकार ५ मिमी,पेक्षा कमी असेल तर तो योग्य आहारामार्फत लघवीद्वारे शरीरातून सहजपणे बाहेर काढता येतो.