scorecardresearch

Premium

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ सोप्या टिप्स! तुमचा वेळ आणि कष्ट वाचवा, आरोग्याचीही घ्या काळजी

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा सोप्या ट्रिक्स, तुमचा वेळही वाचेल आणि कष्टही

Kiran Kukreja a nutritionit share kitchen hacks
आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी इंस्टाग्रामवर काही किचन हॅक्स शेअर केले आहेत (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

स्वयंपाकघरात काम करताना कितीही काम केले तरी काही ना काही कमतरता राहतेच. खूप प्रयत्न करूनही स्वयंपाकघरातील काम मनासारखे होत नाही. काळजी करू नका आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने स्वयंपाकघरातील सर्व काम पूर्ण होतील आणि तुमचा वेळही वाचेल. खरं तर, जर तज्ज्ञांचा सल्ला ऐकला तर वेळ आणि श्रम वाचतोच पण आरोग्य जपण्यास आणि आहाराची अधिक निरोगी ठेवण्यास मदत होईल.

याबाबत आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी इंस्टाग्रामवर काही हॅक्स शेअर केले आहेत.

Chanakya Niti
Chanakya Niti :आर्थिक अडचणी दूर करतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टी, नेहमी राहील लक्ष्मीची कृपा
Watching TV While Eating
जेवताना टीव्ही पाहता का? लगेच थांबवा; तज्ज्ञांनी सांगितलेले दुष्परिणाम जाणून घ्या
Chanakya Niti
Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चाणक्यांचे ‘हे’ शब्द तुमच्याकडे नोट करुन ठेवा; नेहमी राहाल पुढे
amla-honey-black pepper
आवळा-मध-काळी मिरी खरंच रोगप्रतिकार शक्ती वाढवते का?; सद्गुरुंनी सुचवलेल्या उपायांबाबत तज्ज्ञ काय सांगतात…

विविध प्रकारच्या डाळी आणि दाणे रात्रभर भिजत ठेवा कारण ते शिजवण्याचा वेळ कमी करण्यास मदत करते, पचनास मदत करते आणि पोषक तत्वांचे शोषण वाढवते.

भाज्या चिरल्यानंतर धुवू नका कारण त्या भाज्यांमध्ये असलेले पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे विरघळतील. त्याऐवजी, भाज्या प्रथम धुवा आणि नंतर चिरून घ्या. “भाज्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्या कारण जेव्हा तुम्ही भाज्यांचे लहान तुकडे करता आणि स्वयंपाक करताना जास्त उष्णता आणि पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा काही पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे बाहेर पडू शकतात. त्यामुळे पोषक तत्वे वाया जाऊ शकतात,” असे कुकरेजा यांनी सांगितले.’

हेही वाचा – ‘पेपा पिग’, ‘कोको मेलन’ आणि ‘कार्टून मॅरथॉन’ पाहण्यामुळे तुमची मुलं ‘zombie’ झाली आहेत का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

”गरम पाण्यात ग्रीन टी पिशव्या वापरू नका. संशोधनात असे दिसून आले आहे की, काही नॉन-बायोडिग्रेडेबल चहाच्या पिशव्या, विशेषत: नायलॉन किंवा प्लॅस्टिकने बनवलेल्या, गरम पाण्यात भिजल्यावर मायक्रोप्लास्टिकचे कण सोडू शकतात.

अॅल्युमिनियम फॉइलच्या तुलनेत Parchment paper स्वयंपाक आणि बेकिंगसाठी एक सुरक्षित पर्याय मानला जातो कारण ते अन्नावर प्रतिक्रिया होऊ देत नाही किंवा कोणत्याही हानिकारक घटक अन्नात सोडत नाही.

क्लिनिकल आहारतज्ञ गरिमा गोयल यांच्या मते, “Parchment paper मध्ये उष्णता-प्रतिरोधक नॉनस्टिक कोटिंग असते जे ओव्हनमध्ये वापरण्यासाठी सुरक्षित असते. “Parchment paper प्रक्रिया कागदाला greaseproof, टिकाऊ आणि उष्णता- आणि आर्द्रता-प्रतिरोधक देखील बनवते,” गोयल यांनी सांगितले.

हेही वाचा – विरजण न लावता झटपट दही कसे लावावे? जाणून घ्या सोपी ट्रिक

हिंग, ज्याला Asafoetida असेही म्हणतात, हा भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे. त्यात पाचक गुणधर्म आहेत आणि गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कमी करण्यासाठी ते पदार्थांमध्ये वापरले जे कधीकधी शेंगा (जसे की मसूर आणि सोयाबीनचे) किंवा काही भाज्या (जसे की फ्लॉवर आणि कोबी) खाताना ही समस्या उद्भवू शकते. याबाबत गोयल यांनी सहमती दर्शवत सांगितले, ” हिंग याच्या अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे, ते पोटात संसर्ग होण्याची शक्यता कमी करते.”

जर तुम्ही मिठाच्या सेवनाबद्दल चिंतित असाल तर स्वयंपाकाच्या सुरुवातीला मीठ घालण्याऐवजी शेवटी वापरणे उपयूक्त ठरू शकते.“ही पद्धत तुम्हाला मीठाचे प्रमाण अधिक अचूकपणे नियंत्रित करण्यास अनुमती देते आणि तुमच्या डिशेसमध्ये जास्त प्रमाणात मीठ टाकण्यापासून रोखू शकते. हे विशेषतः फायदेशीर ठरते जेव्हा तुम्ही पदार्थांची मात्रा कमी करतात किंवा मटनाचा अळणी रस्सा किंवा सॉससारखे खारट पदार्थ वापरत असता,” असे कुकरेजा यांनी स्पष्ट केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kiran kukreja a nutritionit share kitchen hacks you must know that are non negotiable in the kitchen snk

First published on: 27-11-2023 at 18:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×