दिवाळी येण्याआधी प्रत्येकजण घराची साफसफाई करण्यात गुंतलेलो असतो. दिवाळीत घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो पण बहुतेक वेळ स्वयंपाकघर साफ करण्यात जातो. स्वयंपाक करण्यापासून ते भांडी पर्यंत दिवसभर स्वयंपाकघराचा वापर केला जातो. त्यामुळे ते साफ करणे खूप कठीण होऊन बसते. येथे आम्ही तुम्हाला असे काही सोपे मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे स्वयंपाकघर अगदी कमी वेळेत चमकवू शकता

बेसिंक आणि कचरा डब्यांमधून दुर्गंधी दूर करा

सहसा स्वयंपाकघरातील खाण्यापिण्याच्या कचरा किचनच्या डस्टबिनमध्ये टाकला जातो, त्यामुळे या ठिकाणी खूप दुर्गंधी येत राहते. त्याचबरोबर बेसिंकमध्ये खरकटी भांडी ठेवल्याने दुर्गंधीही येते. दिवाळीपूर्वी बेसिंक आणि किचनचा हा भाग छान स्वच्छ करून सुगंधित करा. लेमन आइस क्यूब हे करण्याचा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही आइस क्यूब ट्रेमध्ये लिंबाच्या फोडी, सेंधव मीठ आणि पाणी टाका. यानंतर तयार झालेले लेमन आइस क्यूब तुम्ही बेसिंकमध्ये आणि त्यातील पाईपमध्ये टाका. तसेच बेसिंगच्या आसपास ठेवा याने लिंबू आणि सेंधव मीठ हे बेसिंकच्या बाजूला जमलेली घाण साफ करते. तसेच लिंबू हे बेसिंकमधून येणारा दुर्गंध नाहीसा येतो आणि ताजे ठेवण्यास मदत करते.

Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

झोपण्या आधी ओव्हन स्वच्छ करा

ओव्हनचे काम झाल्यावर लगेच साफ करण्याऐवजी तुम्ही ओव्हन थोड्या वेळेने स्वच्छ करा. त्यामुळे त्यावर साचलेली घाण सहज निघते. स्प्रे बाटलीमध्ये १/३ कप पाणी, १/३ कप व्हाईट व्हिनेगर आणि १/२ कप बेकिंग सोडा यांचे पाणी तयार करा. ओव्हन थंड झाल्यावर तयार केलेले पाणी सर्व ओव्हनवर स्प्रे करा आणि रात्रभर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर साबणाच्या पाण्याने ओव्हन स्वच्छ करा आणि कोरड्या कापडाने पुसून टाका. तुमच्या ओव्हनला चांगला वास येईल आणि ते चमकेल.

ओव्हन रॅक धुवा

डिटर्जंटचा वापर केवळ कपडे धुण्यासाठी केला जात नाही. याच्या मदतीने तुम्ही तुमचा ओव्हन रॅक स्क्रब न करताही चमकदार करू शकता. एका टबमध्ये वॉशिंग पावडर टाकून त्यात ओव्हन रॅक बुडवून ठेवा. त्यानंतर चार तासांनी ते काढून टाका आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

किचन कॅबिनेटची साफसफाई

किचन कॅबिनेटवर अनेकदा डाग आणि ग्रीस जमा होतात. तुम्ही ते नैसर्गिक क्लिनरने स्वच्छ करू शकता. याने तुमच्या किचनला वास येईल आणि कॅबिनेट चमकदार दिसेल. हे करण्यासाठी एका बाटलीमध्ये १ झाकण लिंबाचे तेल आणि १ झाकण पांढरे व्हिनेगरचे घ्या. आता हे स्प्रे कापडावर घ्या आणि त्याद्वारे स्वयंपाकघरातील कॅबिनेट, दरवाजे आणि बेसबोर्ड स्वच्छ करा. स्वयंपाकघरातील जलद साफसफाईसाठी तुम्ही व्हॅक्यूम ब्रश देखील वापरू शकता

स्वयंपाकघरातील चिमणीच्या रेंज हूडला तेलाने स्वच्छ करा

स्वयंपाकघरातील बहुतेक गोंधळ चिमणीवर आहे आणि त्यातील रेंज हूड साफ करणे हे सोपे काम नाही. धुळीबरोबरच अन्नातून बाहेर पडणारे तेल किंवा वाफही त्यावर चिकटते. त्याच्या पृष्ठभागावरील घाण काढून टाकणे हे खूप कठीण काम आहे, परंतु आपण हे काम अगदी सहजपणे करू शकता. यासाठी वनस्पती तेल वापरा. फक्त त्याचे काही थेंब कापडात किंवा कागदाच्या टॉवेलमध्ये टाका आणि पृष्ठभाग पुसून टाका, याने घट्ट जमलेली तेलकट घाण सहज बाहेर येईल.

क्लीनिंग रेंज हूड फिल्टरची साफसफाई

चिमणीच्या फिल्टरवरही भरपूर ग्रीस जमा होते. ते स्वच्छ करण्यासाठी, एका मोठ्या भांड्यात पाणी उकळवा आणि त्यात १/२ कप बेकिंग सोडा घाला. यानंतर, फिल्टर पूर्णपणे भांड्यात बुडवा. जर संपूर्ण फिल्टर एकाच वेळी पाण्यात बुडवले नाही तर एका बाजूने साफ केल्यानंतर, ते उलट करा आणि दुसर्‍या बाजूला थोडा वेळ भिजवू द्या. हे लक्षात ठेवा की ते साफ करताना हातात हातमोजे घाला.

बेसिंकच्या डिस्पोजल गार्डला टूथब्रशने घासून घ्या

बेसिंकच्या डिस्पोजल गार्डमध्ये अनेकदा भांडी साफ करताना खरकटे अडकले जाते. आता तुमच्याकडील टूथब्रश अँटी-ग्रीस सोल्युशनमध्ये बुडवा आणि फ्लॅप आतून आणि बाहेर घासून घ्या. यामुळे मध्येच अडकलेली सगळी घाण सहज बाहेर येईल.