Cooking Oil Reuse Tips : पुऱ्या किंवा इतर पदार्थ तळल्यानंतर कढईतील तेलामध्ये पिठाचे छोटे कण, मसाले आणि जळालेले तुकडे तसेच राहतात जर हे कण न काढता तेल पुन्हा वापरले, तर जेवणाची चव बिघडू शकते आणि तेलही लवकर खराब होते.तर दुसरीकडे प्रत्येक असे तेल न वापरता फेकून देणे खिशाला परवडणारे नसते.

किचन एक्सपर्ट्सच्या मते, जर तेल फक्त एकदाच वापरले असेल आणि ते जास्त जळालेले नसेल, तर ते योग्य पद्धतीने गाळून मर्यादित प्रमाणात पुन्हा वापरता येऊ शकते. यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स वापराव्या लागतात. चला तर मग जाणून घेऊया पुऱ्या तळल्यानंतर उरलेले तेल कसे स्वच्छ करावे आणि ते पुन्हा वापरण्यासाठी सुरक्षितपणे कसे साठवावे.

१. तेल पूर्णपणे थंड होऊ द्या

  • पुऱ्या तळल्यानंतर लगेचच तेल गाळण्याची चूक करू नका.
  • आधी तेल सामान्य तापमानाला (Normal Temperature) पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • गरम तेल हाताळणे धोकादायक ठरू शकते.
  • तेल थंड झाल्यावर त्यातील जळालेले कण आपोआप तळाशी बसतात. तेल स्वच्छ करण्याची ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे.

२. बारीक गाळणी किंवा सुती (मलमलच्या) कापडाने गाळा

  • थंड झालेले तेल स्टीलच्या बारीक गाळणीने गाळून घ्या.
  • अधिक चांगल्या रिझल्टसाठी मलमलचे स्वच्छ कापड किंवा सुती कपडा वापरा.
  • यामुळे पिठाचे सुक्ष्म कण आणि जळालेले तुकडे तेलातून पूर्णपणे वेगळे होतात.
  • गाळल्यानंतर तेल बऱ्याच अंशी स्वच्छ आणि पारदर्शक दिसू लागते. यामुळे तेलाची गुणवत्ता टिकून राहते.

३. तेलाचा वास आणि रंग नक्की तपासा

  • जर तेलातून तीव्र जळालेला वास येत असेल, तर त्याचा पुन्हा वापर करू नका.
  • जर तेलाचा रंग जास्त गडद तपकिरी किंवा काळा पडला असेल, तर ते फेकून देणेच योग्य ठरते.
  • ज्या तेलातून धूर निघत असेल, ते आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. तेलाचा दर्जा तपासणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

४. एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा

  • गाळलेले तेल नेहमी स्वच्छ आणि सुक्या डब्यात किंवा भांड्यात ठेवावे.
  • हवा बंद (Air-tight) झाकण असलेल्या भांड्याचा वापर करा.
  • हे तेल ओलावा, दमट जागा आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. यामुळे तेल जास्त काळ टिकून राहते.

५. पुन्हा वापरताना घ्यायची काळजी

  • उरलेल्या तेलाचा वापर पुन्हा डीप फ्राय (मोठ्या प्रमाणावर तळण्यासाठी) न करता, भाजी बनवण्यासाठी किंवा फोडणीसाठी करा.
  • एकच तेल वारंवार गरम करणे टाळा.
  • जुने तेल आणि नवीन तेल एकत्र मिसळू नका.

पण रजेपेक्षा जास्त वेळा एकाच तेलाचा पुनर्वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे मर्यादित वापर हाच सर्वोत्तम पर्याय आहे.