स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू अतिशय काळजीपूर्वक स्वच्छ ठेवणे आणि तिची काळजी घेणे गरजेचे असते. कारण- त्यातील घाण जेवणावाटे थेट तुमच्या शरीरात पोहोचते; ज्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी स्वयंपाकघरातील लाकडी पोळपाट-लाटणेही स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
प्रत्येकाच्या घरात पोळपाट-लाटणे वापरले जाते; परंतु बहुतेक लोक त्याची स्वच्छता गांभीर्याने घेत नाहीत. तसेच ते साफ करण्याच्या योग्य पद्धतीही त्यांना माहीत नसतात; ज्यामुळे लाकडी पोळपाट-लाटणे काळपट दिसते आणि त्यावर बुरशी जमा होऊ लागते. अशा वेळी तुम्ही खालील काही सोप्या टिप्स वापरून पोळपाट-लाटणे सहजपणे स्वच्छ करू शकता.
पोळपाट-लाटणे स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
१) पोळपाट-लाटण्याला जीवाणूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक वापरानंतर ते स्वच्छ करा. कारण- त्यावरील पिठाच्या ओलाव्यामुळे बुरशी आणि जीवाणू वेगाने वाढतात.
२) लाकडी पोळपाट-लाटणे वापरल्यानंतर ते एका भांड्यात गरम पाणी घेऊन पाच मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर ते हलकेसे स्क्रब करून स्वच्छ करा. स्टील स्क्रबर वापरू नका. कारण- त्याने घासल्याने पोळपाट-लाटणे खडबडीत होऊ शकते.
३) लाकडी पोळपाट-लाटण पाण्याने धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करा. त्यानंतर त्यावर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह लावा. त्यानंतर ३० मिनिटांनी स्वच्छ कापडाने पुसून स्वच्छ ठिकाणी ठेवा.
४) पोळपाट-लाटणे नियमित स्वच्छ करण्याव्यतिरिक्त महिन्यातून एकदा ते व्यवस्थित स्वच्छ करा. कारण- ओल्या झालेल्या लाकडी वस्तूत लगेच जीवणू जमा होतात; जे वेळेत स्वच्छ करणे महत्त्वाचे असते.
५) पोळपाट-लाटणे महिन्यातून एकदा गरम पाणी आणि व्हिनेगरमध्ये १० मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर गरम पाण्याने चांगले धुवा आणि उन्हात चांगल्या प्रकारे वाळवा.
६) लाकडाचे पोळपाट-लाटणे जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवू नका. त्यावर जास्त वेळ ओले पीठ ठेवू नका. त्याशिवाय ते कधीही नीट कोरडे न करता ठेवू नका.