How To Keep Salt Dry : पावसाळा असो किंवा स्वयंपाकघरातील दमट हवामान, भरणीतील मीठ ओलसर होणे ही एक सामान्य समस्या आहे. मीठ ओलसर झाले की भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये ते योग्य प्रमाणात घालणे कठीण जाते, तसेच प्रमाणाचा अंदाज चुकण्याचीही भीती असते. सॅलड किंवा सूपवर मीठ भुरभुरताना ओलसरपणामुळे ते स्पिंक्लरमधून बाहेर येत नाही, ज्यामुळे वेळ आणि मूड दोन्ही खराब होतो.
मात्र, आता या छोट्याशा समस्येमुळे त्रस्त होण्याची अजिबात गरज नाही! तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही वस्तूंचा वापर करून तुम्ही मीठ वर्षभर कोरडे आणि फ्रेश ठेवू शकता. जाणून घेऊया ३ जबरदस्त किचन हॅक्स:
१. तांदळाचा पारंपरिक आणि प्रभावी उपाय हा पिढ्यानपिढ्या वापरला जाणारा अत्यंत प्रभावी उपाय आहे. मिठाच्या भरणीत मीठ भरण्यापूर्वी त्यात १० ते १५ कच्चे तांदळाचे दाणे टाका. तांदळामध्ये ओलावा शोषून घेण्याची प्रचंड क्षमता असते. त्यामुळे ते मिठातील अतिरिक्त आद्रता त्वरित शोषून घेतात. तांदळाचे दाणे मिठाच्या स्पिंक्लरच्या छिद्रांपेक्षा मोठे असल्याने ते जेवणात किंवा ताटात पडण्याची भीती नसते.
२. लवंग किंवा राजम्याचा वापर जर तुम्हाला तांदूळ वापरायचे नसतील, तर मिठाच्या भरणीमध्ये ४ ते ५ लवंगा टाका. लवंग हवेतील ओलावा वेगाने शोषून घेते आणि मिठाला ओलसर होण्यापासून वाचवते. लवंगेव्यतिरिक्त तुम्ही २ ते ३ कच्चे राजम्याचे दाणेही वापरू शकता. राजमा उत्तम मॉइश्चर ॲब्जॉर्बर (Moisture Absorber) म्हणून काम करतो आणि आकाराने मोठा असल्याने मिठात सहज दिसून येतो.
३. टिशू पेपरचा बेस तयार करा मिठाची भरणी स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळवल्यानंतर, मीठ भरण्यापूर्वी तिच्या तळाशी टिशू पेपर किंवा ब्लॉटिंग पेपरचा छोटा तुकडा ठेवा आणि त्यावर मीठ भरा. हा कागद खालून किंवा बाहेरून येणारा ओलावा शोषून घेतो.
महत्त्वाची टीप: मीठ ठेवण्यासाठी नेहमी काचेच्या किंवा सिरॅमिक (चीनी माती) भरणीचा वापर करा. प्लास्टिकच्या भरणीत ओलावा लवकर तयार होतो.
