How To Avoid Potatoes Sprouts: चटकन कापला, पटकन शिजवला, आणि चवीने खाल्ला असा भाजीचा एकमेव प्रकार म्हणजे बटाटा. अगदी मऊ जेवणाने दातांना आराम द्यायचा असेल तर मॅश करून उकडून खाता येतो आणि कुरकुरीत खायची इच्छा असेल तर भज्यांपासून ते चिप्स, फ्राईज वेगवेगळ्या रूपात वापरता येतो. थोडक्यात काय तर बटाट्याचं अष्टपैलुत्व इतकं कमाल आहे की आजघडीला जगात बटाट्याच्या चाहत्यांची संख्या अब्जावधींच्या घरात असेल. पण समस्या कुठे उद्भवते, जेव्हा आपण साठवणीत ठेवायला विकत आणलेल्या बटाट्यांना वापरायच्या आधीच कचऱ्यात टाकायची वेळ येते. मोड/ अंकुर आल्याने अनेकदा बटाटे मऊ होऊन कुजतात. हे टाळण्यासाठी आज आपण खास आजीच्या बटव्यातील काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

बटाट्यांना मोड येऊ नयेत म्हणून करा हे उपाय

तुम्ही कधी भाजी मंडईत नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की भाजी विक्रेते बाकी सगळ्या भाज्या समोर ठेवत असले तरी बटाटे मात्र एखाद्या गोणीत किंवा ट्रेमध्ये ठेवतात जिथे फार उजेड नसतो. कारण बटाटे हे शक्यतो अंधारात ठेवल्यावर त्यांना मोड येण्याचे प्रमाण कमी होते. बटाटे सहसा कोरड्या जागेत ठेवल्यास सडत नाहीत पण उन्हात ठेवल्यास त्याला अंकुर फुटू शकतात. हवेशीर जागी बटाटे ठेवा पण तिथे थोडा अंधारच असेल असे पाहा.

unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Pune School Girl Floating In Air Viral Video, Medical Emergency Not Superstitions
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी
A hilarious answer written by a 5th student
विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पाचवीतल्या विद्यार्थ्याने लिहिलं हटके उत्तर; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
kartiki gaikwad welcomes baby boy
कार्तिकी गायकवाड झाली आई! गायिकेच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन; म्हणाली…
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?

कोणतीही हिरवी औषधी वनस्पती तुम्हाला बटाटे ताजे ठेवण्यास आणि त्यामध्ये अंकुर फुटणे टाळण्यास मदत करू शकते. एखादी कापसाची, मलमलची पिशवी घ्या त्यात हर्ब्स किंवा पालेभाजी ठेवा व मग त्यात बटाटे भरून ठेवा.

सफरचंद, संत्री किंवा अन्य फळे बटाट्यासह ठेवू नका. वनस्पती आणि बागकाम तज्ज्ञ ऑलिव्हिया चुंग यांच्या हवाल्याने विकिहाउ साईटने दिलेल्या माहितीनुसार, “कांदे आणि सफरचंद इथिलीन वायू उत्सर्जित करतात, ज्यामुळे अंकुर येण्याच्या प्रक्रियेला गती मिळते.” यावरून झालेल्यास काही अभ्यासात असेही दिसून आले आहे की सफरचंदामुळे बटाटे मऊ होऊ शकतात. तर काही अभ्यासांमध्ये सफरचंद बटाट्यांसह ठेवल्याने अंकुर फुटण्याचा वेळ वाढल्याचे सुद्धा दिसून आले आहे. खबरदारी म्हणून आपण जास्त पाणीदार फळे बटाट्यांसह स्टोअर करणे टाळा.

बटाट्यांच्या आजूबाजूला आर्द्रता असेल तर पटकन अंकुर फुटू शकतात. बटाटे साठवून ठेवताना सुद्धा ते ओले नसतील याची खात्री करा. बटाट्याला लागलेली धूळ सुद्धा फडक्याने पुसून घ्या व जेव्हा तुम्ही बटाटे चिरायला घ्याल तेव्हाच पाण्याने धुवा. बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये तर चुकूनही ठेवू नका.

हे ही वाचा<< रोज झोपेतून उठताच मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीराला काय मिळतं? किती मनुके खावे, हा जादुई उपाय आहे का?

तसेच एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही, विशेषतः अन्न. विविधतेनुसार, बटाट्यांना ३० ते १४० दिवसांनी नैसर्गिकरित्याच अंकुर फुटण्यास सुरुवात होते. बटाट्याला मोड आल्याचे लक्षात आल्यास वेळीच कापून टाका. व असे बटाटे शक्यतो लवकरच वापरून टाका.