scorecardresearch

Premium

Kitchen Jugaad : कांद्याची साल कचरा समजून चुकूनही फेकू नका, असा उपयोग करा अन् मिळवा अफलातून फायदे

कचरा समजल्या जाणाऱ्या कांद्याच्या सालीचे फायदे वाचाल तर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

Kitchen Jugaad
कांद्याची साल कचरा समजून चुकूनही फेकू नका, असा उपयोग करा अन् मिळवा अफलातून फायदे (Photo : Pexels)

how to use Onion Peels : कांद्याचा उपयोग हा जास्तीत जास्त रेसिपीमध्ये केला जातो. सहसा कांदा कापताना आपण कांद्याची साल टाकून देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, कांद्याची साल किती उपयोगाची आहे. हो, हे खरंय. कचरा समजल्या जाणाऱ्या कांद्याच्या सालीचे फायदे वाचाल तर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • सध्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. शारीरिक हालचाल कमी असताना त्यात आपण जंक फूडचे सेवन करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, कांद्याच्या सालीमुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. जर तुम्ही कांद्याच्या सालीचे पाणी उकळून प्यायले तर याचा फायदा तुम्हाला दिसून येईल.
  • अनेक जणांची रोगप्रतिकारकशक्ती खूप कमी असते. अशा लोकांना व्हायरल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. पण, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कांद्याची साल फायदेशीर आहे. या सालीमध्ये व्हिटामिन सीची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते. ही कांद्याची साल पाण्यात उकळावी आणि हे पाणी गाळून प्यावे.

हेही वाचा : Jugaad Tricks : बॅगवरील काळे डाग झटक्यात होतील गायब, फक्त हे सोपे घरगुती उपाय करा

Cozy Cardio
‘रोज गाणी ऐकत ४५ मिनिटे घरातच चाला’ असे सांगणारा Cozy Cardio व्यायाम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सर्वकाही
benefit of emotional intelligence
Mental Health Special: भावनात्मक बुद्धिमत्तेचा (EI) फायदा काय?
Doctor Micky Mehta Jumping Jack Routine For You To Loose Inches and Kilos Perfect Lazy Day Workout Routine You Should DO
Weight Loss: जंपिंग जॅक ठरेल वजन कमी करायची सोपी हॅक! डॉ. मेहतांकडून जाणून घ्या फायदे व प्रभावी पद्धत
What Happens To Body If You Eat Dry Fruits Kaju Badaam Manuka Everyday Health Expert Tells Benefits What to Do and Not
तुम्ही रोज काजू, बदाम, मनुक्यासारखा सुकामेवा खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
  • कांद्याच्या सालीमध्ये रेटिनॉल आणि व्हिटामिन ए ची मात्रा अधिक असते. हे पोषक तत्वे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कांद्याच्या सालीचा उपयोग करून तुम्ही डोळ्यांची दृष्टी वाढवू शकता. यासाठी पाण्यामध्ये कांद्याची साल उकळावी आणि हे कोमट पाणी गाळून प्यावे.
  • केसांच्या सौंदर्यासाठी केसांची निगा राखणे खूप गरजेचे आहे. कांद्याच्या सालीचा उपयोग करून तुम्ही केसांचे सौंदर्य वाढवू शकता. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यात कांद्याची साल टाका. एका तासानंतर त्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांच्या समस्या दूर होऊ शकतात.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen jugaad never throw onion peels use it smart and get benefits kitchen hacks ndj

First published on: 23-09-2023 at 12:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×