Kitchen jugaad video: बहुतांश घरांमध्ये सिलिंडरचा वापर जेवण तयार करण्यासाठी होतो. बहुतांश घरात शेगडी जवळ सिलिंडर ठेवण्यात येते. हा सिलिंडर लोखंडापडून तयार केले जातात. ज्यामुळे तो वजनाला फार जड असतात. स्वयंपाकघरात सिलिंडर जिथे ठेवला जाते, त्या ठिकाणी घाणेरडे गंजाचे डाग तयार होतात. डाग कुठेच चांगले दिसत नाहीत. कपड्यावर असो अथवा किचनच्या टाईल्सवर. दिसायला हे खूपच घाण दिसते. पण त्यातही किचनमधील सिलिंडरचे डाग लादीवर उमटले तर लादीची चमक अधिक खराब होते. किचनच्या लादीचा रंग पांढरा असेल तर यावर हे डाग अधिक उठून दिसतात.
तसंच सिलिंडर ज्या भागात ठेवला जातो तिथेही डाग उमटलेले दिसतात. मग अशा वेळी जर स्वच्छता करायची असेल आणि सिलिंडरचे डाग घालवायचे असतील तर मात्र खूप विचार करावा लागतो. पण आता तुम्हाला डोकं खाजवावं लागणार नाही तर किचनमधील सिलिंडरचे डाग घालविण्यासाठी तुम्ही सोप्या हॅक्सचा वापर करा. दरम्यान, गृहिणींसाठी आम्ही एक जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला सिलिंडरखाली एक प्लॅस्टीकची पिशवी ठेवायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सिलिंडरखाली पिशवी कशाला? तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नक्की करायचं काय ?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेनं रिकाम्या झालेल्या सिलेंडरखाली एक प्लॅस्टिक पिशवी ठेवली आहे. तुम्ही कोणतीही पिशवी वापरू शकता. तुमच्याकडे बिस्कीटची मोठी रिकामी पाकीटं असतील तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. ही रिकामी पिशवी सिलेंडरच्या खाली ठेऊन सिलिंडर सहजपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सरकवून नेऊ शकता. यामुळे टाईल्सवर रेघोट्या पडणार नाहीत आणि सिलिंडर सरकवून नेणं सोपं होऊ शकेल.
पाहा व्हिडीओ
@IndianVloggerPinki यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)
