Viral Video : सोशल मीडियावर घरगुती उपाय सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उपाय इतके भन्नाट असतात की पाहून कोणीही थक्क होईल. तुमच्या घरात झुरळं आणि पाली आहेत का? जर हो, तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की घरातून झुरळं किंवा पाली कशा पळवायच्या? पण टेन्शन घेऊ नका. सध्या एक असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका डांबर गोळीच्या मदतीने तुम्ही घरातील पाली किंवा झुरळं पळवू शकता. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (kitchen jugaad video as naphthalene ball was put in hot water jugaad video a woman told a unique trick watch viral video)

या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्या आणि हे पाणी गरम करा.
त्यानंतर त्यात एक डांबरगोळी टाका आणि त्याचबरोबर एक कापूरची वडी सुद्धा या गरम पाण्यात टाका.
जोपर्यंत ही डांबर गोळी पाण्यात विरघळत नाही, तोपर्यंत गॅस सुरू ठेवा.
गरम पाण्यात ही डांबरगोळी विरघळताना दिसते व पाण्याच्या वरती एक थर जमा होतो
डांबरगोळी विरघळल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी कोमट होण्यापूर्वी हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यानंतर त्यात तीन ते चार चमचे तुम्ही जे वापरता ते लिक्विड फ्लोअर टाका आणि हा स्प्रे जिथे पाल येत असतील किंवा झुरळ दिसतील तिथे मारा.
१५ दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल.
फक्त स्प्रे मारताना स्वच्छता ठेवा.

Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Tragic shocking Video: 4-Yr-Old Girl Drowns In Ganga As Her Aunt Makes Instagram Reel In UP’s Ghazipur
Shocking video: रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; ती बुडत होती अन् आई-मावशी रील बनवत राहिल्या…
Shocking Video madhya pradesh woman jumped from moving train after fighting with her husband
Shocking Video: नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद
Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
Leopard's tactics for monkey hunting
युक्तीने साधला डाव! माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याचा डावपेच; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड

हेही वाचा : झोप नाही तर गाढ झोप घेणं आहे गरजेचं; नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला एकदा पाहा

पाहा व्हायरल व्हिडीओ

prajakta_salve_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डांबरगोळी गरम पाण्यात टाकताच चकित व्हाल”

हेही वाचा : इडली खाताना श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तुमच्यासमोर एखाद्याचा घास अडकल्यास काय करावे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,” आम्ही नेहमी करतो हा प्रयोग” तर एका युजरने लिहिलेय, “याचा काहीही फायदा होत नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “नवीन प्रयोग सांगा.”

प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून असेच घरगुती उपाय किंवा भन्नाट जुगाडचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये ते नवनवीन माहिती देतात. युजर्स सुद्धा त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर भरघोस प्रतिसाद देतात.