Kitchen jugad: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जर तुम्हाला खूप लोकांचं जेवण करायचं असेल तर आता तुम्हाला आचारी बोलावयची किंवा खूप लोकांना कामाला लावण्याची गरज नाही. तसेच एकही पैसे खर्च न करता, हात न कापता या भाज्या अवघ्या ३० सेकंदात कापू शकता. बरं, हा जुगाड करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मिक्सर, चॉपर किंवा अत्याधुनिक गॅजेट वापरचं नाहीये. एकही पैसे खर्च न करता तुम्ही हा जुगाड करु शकता. विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा.
तर हा जुगाड करण्यासाठी तुम्हाला फक्त चमचा, चाकू आणि एक चिकटपट्टी अशा ३ वस्तू लागतील. तर सर्वात आधी एक चमचा घेऊन चिकटपट्टीच्या मदतीनं तो बोटाला चिकटवा. आणि मग चाकूनं आरामात हव्या त्या भाज्या कापा. चमच्यामुळे चाकूचा स्पर्श बोटाला होणार नाही. त्यामुळे अगदी डोळे बंद करून भाज्या कापल्या तरी बोट कापलं जाणार नाही. इतक्या झटपट काम कुठल्याही मशीनने गृहीणी करत नाहीये तर एक ट्रिक वापरुन करत आहे.
पाहा व्हिडीओ
तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. गृहिणीनं अतिशय सोपा जुगाड दाखवला आहे. ही ट्रिक पाहून अनेकजण अचंबित झालेले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ backbencher__balak नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.