Kitchen Tips: जेवण बनवताना फक्त एखादा चविष्ट पदार्थ बनवणे हे टास्क नसते तर त्याबरोबर अनेक लहान-मोठी आव्हानं असतात. ही आव्हानं रोज पुर्ण करत महिला जेवण दररोज जेवण बनवतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक नवा किचन जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला गूळ खाण्या अगोदर गॅसवर ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल काय गूळ गॅसवर ठेवून काय होणारे. गूळ चालू गॅसवर ठेवताच अशी कमाल की तुम्ही विचारही केला नसेल. एकदा तुम्ही हा उपाय पाहिलात तर दररोज कराल.
गूळ हा शरिरासाठी पौष्टीक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. संक्रातीनिमित्त अनेक घरांमध्ये रोज गूळ खाल्ला जातो. काही लोक हिवाळ्यात साखरेऐवजी गूळ खाणे पसंत करतात कारण ते शरीराला उबदार ठेवते. गूळ तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच खूप फायदेशीर आहे, पण आजकाल बाजारात पौष्टीकतेच्या नावाखाली नकली गूळ बनवण्याचे काम वाढले आहे. बाजारात बिनदिक्कतपणे बनावट गूळ मिळत आहे.. आज आम्ही तुम्हाला बनावट गूळ आणि पौष्टीक गूळ ओळखण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही विकत घेतलेला गूळ खरा आहे की नकली हे तुम्ही सहज शोधू शकता? गूळ खरेदी करण्यासाठी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला शुद्ध आणि बनावट गुळातील फरक सहज समजू शकतो. चला तर मग जाणून घेऊया शुद्ध गूळ ओळखण्याच्या काही स्मार्ट टिप्स.
पहिली ट्रिक
या गृहिणीन सांगितल्या प्रमाणे बाजारातून गूळ आणल्यानंतर तो गॅसवर गरम करा आणि थोडा थंड झाल्यावर तो हातानं दाबून पाहा. गूळ जर सहज बारीक झाला तर त्यात कोणतीही मिळावट नाहीये. मात्र हाच गूळ जर बनावट असेल तर त्यातून एक उग्र वास येईल. आणि तो हातानं दबलाही जाणार नाही.
दुसरी ट्रिक
दुसरी ट्रिक अशी की हा गूळ तुम्ही पाण्यातही टाकून पाहू शकता, पाण्यात हा गूळ दाबल्यानंतर सहज विरघळत असेल तर गूळ शुद्ध आहे असं समजा.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen jugad: रात्री झोपण्याआधी फक्त एकदा फ्रिजमध्ये मीठ फिरवा; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
या सर्व गोष्टी बनावट गुळात मिसळल्या जातात
गूळ हे एक सुपरफूड आहे जे तुमच्या शरीराला डिटॉक्स करते. त्यात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. गुळ हा उष्ण मानला जातो, त्यामुळे थंडीच्या दिवसात तो खाल्ला जातो. त्यामुळे तुम्ही खात असलेला गूळ खरा आहे की नकली हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

