Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींनो तुम्ही कधी दुधामध्ये संत्रीची साल घातली आहे का? आता तुम्ही म्हणाल दुधात संत्री कशाला ? मात्र थांबा याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे. मात्र, नेमकी कमाल काय होते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर पाहूयात यामुळे नेमकं काय होतं. आतापर्यंत संत्र्‍याची साल तुम्ही फेकूनच दिली असेल. मात्र, याच संत्र्याच्या सालीचा भन्नाट उपाय आहे. यासाठी एका गृहिणीने किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”

चेहऱ्यावरील घाम, प्रदूषण आणि धुळीमुळे तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव होऊ लागते. अशावेळी चेहऱ्यावर जमा झालेली घाण दूर करण्यासाठी स्क्रबिंग ची गरज असते. तर हाच स्क्रब तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. जी संत्र्‍याची साल तुम्ही फेकून देता तिच संत्र्‍याची साल तुमच्या त्वचेवरचा काळपटपणा दूर करु शकते.

नेमकं करायचं काय ?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेनं सांगितल्याप्रमाणे एका कढईमध्ये थोडं दूध घ्या ते चांगलं उकळवा. त्यानंतर त्या दुधामध्ये संत्र्याच्या साली घाला आणि पुन्हा एकदा चांगलं शिजवून घ्या. शिजल्यावर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करा आणि एका भांड्यात काढा. दुसरीकडे तव्यावर हळद आणि बेसन भाजा, रंग हलका तपकीरी होईपर्यंत हलवत राहा. त्यानंतर संत्र आणि दूध बारीक केलेल्या पेस्टमध्ये ही पावडर टाकून मिक्स करा. आता ही पेस्ट लावायची कुठे तर ही पेस्ट ज्या ठिकाणी त्वचा काळी पडली आहे किंवा डाग आहेत त्या त्वचेवर लावा. चेहऱ्यावर ही पेस्ट लावायची नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> केस लांब हवे, पण केसगळती थांबतच नाही? फक्त एक महिना आहारात पालकचा समावेश करा

health_guru_marathi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

Story img Loader