scorecardresearch

‘ही’ ५ फळं चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका; जाणून घ्या याचे तोटे

Fruits You Should Never Refrigerate: कोणती फळं फ्रिजमध्ये ठेवणे नुकसानकारक ठरते जाणून घ्या

‘ही’ ५ फळं चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका; जाणून घ्या याचे तोटे

Fruits You Should Never Refrigerate: अनेकवेळा आपण भरपूर फळं आणि भाज्या विकत घेतो. या गरजेपेक्षा जास्त घेतलेल्या भाज्या आणि फळं जास्त दिवस टिकून राहावी यासाठी मग फ्रिजचा आसरा घेतला जातो. फ्रिज हे प्रत्येक घरातील अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे. कारण अन्न ताजे ठेवण्यासाठी त्यांची खुप मोठी मदत होते. भाज्या, फळं अनेक दिवस फ्रिजमध्ये ताजे राहतात. पण काही फळं अशी आहेत ज्यांना कधीच फ्रिजमध्ये ठेऊ नये, कारण यामुळे त्यांच्यातील पोषकतत्त्व निघून जातात. कोणती आहेत अशी फळं जाणून घ्या.

ही फळं फ्रिजमध्ये ठेवणे टाळा:

केळी
केळी फ्रिजमध्ये ठेऊ नयेत, ती सामान्य तापामानालाच साठवावी. फ्रिजमध्ये ठेवल्यास केळी लगेच काळी पडतात आणि खराब होतात. केळ्यांमधून इथीलीन गॅस बाहेर पडतो ज्यामुळे इतर फळं लवकर पिकु शकतात.

आणखी वाचा: दही खाणे कोणी टाळावे? जाणून घ्या दह्याचे Side Effects

सफरचंद
सफरचंद अत्यंत पौष्टिक फळं आहे, हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. सफरचंद फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे, कारण यामुळे त्याच्यातील पोषकतत्त्व कमी होतात. जर सफरचंद फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर ते कागदात गुंडाळून ठेवा.

टरबूज
टरबूजामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. टरबूजाचा आकार मोठा असल्याने ते एका वेळी संपवणे कठीण जाते, म्हणून बऱ्याचदा ते फ्रिजमध्ये ठेवले जाते. पण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील अँटिऑक्सिडंट, पोषकतत्त्व नष्ट होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा

लिची
लिची देखील बरेच दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्यातील पोषकतत्त्व नष्ट होतात. त्यामुळे लिची फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे.

आंबा
पिकलेले आंबे लवकर खराब होऊ नयेत आणि जास्त दिवस तिकवेत यासाठी ते फ्रिजमध्ये साठवले जातात. पण आंबे फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील अँटिऑक्सिडंट, पोषकतत्त्व कमी होतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 16:48 IST

संबंधित बातम्या