स्वयंपाक करणं जाम मोठं काम. हे काम ज्या पुरूष आणि स्त्रियांना जमतं त्यांच्या हाती मोठी कला असते म्हणे. पण स्वयंपाक करताना अनेक कटकटीही असतात. सगळं साहित्य जमवायचं. भाज्या कापायच्या, सगळं ताजं आहे की नाही याची खात्री करायची. मग ते सगळं नीटपणे शिजवायचं. आणि सगळी काळजी घेत डिश बनवायची.
पण अनेक पदार्थ असेही असतात की ते फार काळ उघड्यावर ठेवले तर ते खराब होतात. उदाहरणार्थ सफरचंद कापून फार वेळ उघड्यावर ठेवलं तर लाल पडतं. तसंच बटाटे कापून फार वेळ उघड्यावर ठेवले तर काळे पडतात.
बटाटा हा आपल्या जवळपास सगळ्याच डिशेसमध्ये वापरला जात असल्याने तो कापून काळा पडू नये म्हणून वापरायच्या टिप्स




१. बटाटे कापले की ते एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बुडवून ठेवावे. या पाण्यात लिंबाचे दोन चार थेंब पिळले की बटाट्याचा पांढरा रंग कायम राहतो. व्हिनेगरचाही वापर करता येतो.
२. जर बटाट्याचे हे तुकडे दुसऱ्या दिवशी वापरायचे असतील तर ते पाण्यात भिजवून फ्रीजमध्ये ठेवावेत
३. जर बटाटे उकडलेले असतील तर ते तुकडे थंड पाण्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवले तरी ते काळे न पडता चांगले सफेद राहतात.
नेहमी स्वयंपाकाची सवय असणाऱ्यांना अशा बऱ्याच ‘किचन टिप्स’ आधीपासूनच माहीत असतात. पण नुकतेच स्वयंपाक करू लागलेल्यांना या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी माहिती नसल्या तर गडबड होते. बाहेरगावी राहावं लागलं तर ही परिस्थिती येण्याची शक्यता जास्त. त्यामुळे तैयार रहनेका!