scorecardresearch

Premium

Kitchen Jugaad: फ्रिजला फक्त एकदा लावा हार्पिक, पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल लाइट बिल

Kitchen Jugaad: फ्रिजमध्ये टॉयलेट क्लिनर लावल्यावर पाहा काय झालं…

kitchen tips in marath harpic in fridge cleaning tips how to saved electricity light bill kitchen jugaad video
वीज बिल, लाइट बिल कसं कमी करायचं? (फोटो: युट्युब/ @simplymarathi3177K वरून साभार)

How To Save Electricity Bill Through Fridge:  तुम्ही आतापर्यंत हार्पिकचा वापर बाथरूम-टॉयलेटची साफसफाई करण्यासाठी केला असेल. पण असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याचा वापर फ्रिजमध्ये केल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण टॉयलेट चकाचक करणारं हार्पिक फ्रिजला लावल्याने तुमचं लाइट बिल कमी होईल. एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे. पण या व्हिडीओमागे नेमकं काय सत्य आहे ते जाणून घेऊया…

किचनची साफसफाई रोज होत असली तरी घरातल्या कानाकोपऱ्यात बरीच धूळ, घाण साचते. फ्रिजचं रबर साफ करायला बरेचजण विसरतात. यामुळे रबर खडबडीत दिसतं. यामुळे दरवाजा व्यवस्थित बंद होत नाही आणि कुलिंगसुद्धा कमी होतं. परिणामी लाईट बिल जास्त येत. पण आता फ्रीजमुळे लाईट बिल वाढण्याचं टेन्शनच नाही. कारण हार्पिक वापरल्याने फ्रिजमुळे जास्त येणारं तुमचं लाइट बिल कमी होईल. आता हे कसं शक्य आहे, त्यासाठी हा व्हिडीओ पाहा.

shane warne dope test
World Cup Cricket: वजन कमी करण्यासाठीचं औषध घेतलं आणि साक्षात शेन वॉर्न ड्रग्ज टेस्टमध्ये अडकला
fukrey-3 and The Vaccine War box-office-collection-day 3
‘फुकरे ३’ चा बॉक्स ऑफिसवर जलवा! पहिल्या दोन दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी तुफान कमाई, ‘द व्हॅक्सिन वॉर’लाही टाकलं मागे
Watch In Japan passengers on a bullet train enjoy WWE-style match
चालत्या बूलेट ट्रेनमध्ये कुस्तीपटूंची WWE स्टाइलमध्ये मारामारी; प्रवाशांनी लुटाला सामन्याचा आनंद, पाहा Viral Video
Japanese woman files complaint after Singapore eatery charges Rs 56k for crab dish
बापरे! एका खेकड्याची किंमत लावली ५७ हजार; महिलेनं हॉटेल मालकाविरोधात पोलिसांत केली तक्रार

फ्रिजमध्ये टॉयलेट क्लिनर लावताच झाली कमाल

रेफ्रिजरेटर सहसा प्रत्येकाच्या घरात असतात. शहराशिवाय आता खेड्यापाड्यातील अनेक घरांमध्येही तो दिसतो. फ्रीज वापरताना तो खूप घाण होतो आणि तो पुसण्यासाठी आपण अनेक पद्धती अवलंबतो. पण दारावरील रबराकडे लक्ष देणारे फार कमी जण असतील. फ्रीजच्या दरवाजाचे रबर खूप लवकर घाण होते. त्यामुळे तुम्ही हार्पिकचा वापर करा. एका भांड्यात हार्पिक घेऊन एका जुन्या टुथब्रशच्या मदतीने ते फ्रिजच्या रबरमध्ये घासा. संपूर्ण रबर असा स्वच्छ करून घ्यायचा आहे. यामुळे रबरमध्ये असलेली सर्व घाण स्वच्छ होईल. काही मिनिटांतच रबर नव्यासारखा चकचकीत होईल आणि तुम्ही दरवाजा बंद करून पाहिला तर तो आधीपेक्षा घट्ट लागेल. त्यातील थंड हवा बाहेर येणार नाही आणि फ्रिजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी जास्त वीज लागणार नाही. साहजिकच यामुळे तुमचं लाइट बिलही कमी होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवा आणि असा वापरा; महिलाच नव्हे तर पुरुषांसाठीही मोठा फायदा

सिम्पली मराठी युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen tips in marath harpic in fridge cleaning tips how to saved electricity light bill kitchen jugaad video srk

First published on: 23-09-2023 at 15:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×