Premium

Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा

Viral video: चपात्या कडक-वातड होऊ नयेत म्हणून टिप्स, सकाळी केलेल्या चपात्या रात्रीपर्यंत राहतील मऊ

kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
मऊ चपाती कशी बनवायची ( Photo: @kitchen Tips and tricks )

Kitchen Jugaad Video:  कोणतीही भारतीय थाळी चपातीशिवाय अपूर्ण आहे. चपाती बनवणे देखील एक कला आहे. सुरुवातीला चपाती करताना ती मऊ व गोल आकाराची होईलच असे नाही. ती अनेकदा कडक व जाडसर तयार होते. सामान्यपणे चहाची गाळणी आपण चहा गाळण्यासाठी वापरतो. पण याच गाळणीचा वापर तुम्हाला चपाती बनवतानाही होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चहाच्या गाळणीचा जबरदस्त असा उपयोग एका गृहिणीने दाखवला आहे. या किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भन्नाट किचन जुगाड

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. पीठ मऊ मळले गेल्यानंतर, या कणकेच्या चपात्या सॉफ्ट व टम्म फुलतात. यासह या चपात्या अधिक काळ मऊ व नरम राहतात. सकाळी ऑफिस व शाळेत जाणाऱ्यांची घाई असते, अशा स्थितीत जर आपल्याला झटपट व सॉफ्ट चपात्यांसाठी कणिक मळायचे असेल तर, ही ट्रिक फॉलो करून पाहा. पण तरी चहाच्या गाळणीचा वापर करून चपाती कशी बनवायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल.

चपाती बनवताना चहाच्या गाळणीचा वापर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चपातीवर वाफ असते त्यामुळे चपाती जेव्हा आपण थेट भांड्यात ठेवतो आणि ती थंड होते तेव्हा त्या वाफेचं रूपांतर पाण्यात होतं. चपातीला पाणी सुटतं आणि ती ओली होते. त्यामुळे गॅस किंवा तव्यावरून चपाती काढल्यानंतर ती थेट भांड्यात ठेवू नका. तर आधी चहाच्या गाळणीवर काढा. म्हणजे चपातीची वाफ निघून जाईल. किंचितशी ती थंड होईल. त्यानंतर भांड्यात ठेवा. चपातीला वाफ नाही, त्यामुळे चपातीला पाणीही सुटणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: तांदळात फक्त एक बांगडी टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा 

kitchen Tips and tricks युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral srk

First published on: 02-10-2023 at 12:20 IST
Next Story
Banana Peel: केळ्याची साल कधीच फेकू नका, ‘या’ जुगाडू पद्धतींनी वापरून पाहा वाचतील शेकडो रुपये