Kitchen Hacks: मासिक पाळीदरम्यान सर्वच स्त्रीया सॅनिटरी पॅडचा उपयोग करतात. पूर्वीसारखं आता कुणीही कापड वापरत नाही. दरम्यान तुम्ही सॅनिटरी पॅडचे पॅकेट कपाटात, बाथरुममध्ये, एखाद्या बॉक्समध्ये ठेवत असाल, मात्र हा सॅनिटरी पॅड एकदा फ्रिजमध्ये ठेवून बघा. कित्येक गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड. याचा मोठा फायदा आहे. या उपायाचा परिणाम असा की पाहूनच तुम्ही थक्क व्हाल.हा जबरदस्त असा किचन जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवा

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

आता तुम्ही म्हणाल सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये कोण ठेवतं? तर एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. महिलांसाठी असलेलं हे सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्याचा असा वापर करता येतो, की तो पुरुषांसाठीही फायद्याचा आहे.

सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवल्याचा फायदा काय?

या सॅनिटरी पॅडचं तुम्हाला करायचं काय आहे, तर सॅनिटरी पॅडवर पाणी स्प्रे करायचं आहे. त्यानंतर तो फ्रिजमध्ये ठेवा. १५ ते २० मिनिटं सॅनिटरी पॅड फ्रिजमध्येच ठेवा. यानंतर तो बाहेर काढा. यानंतर काय करायचं ? याचा फायदा काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचा उपयोग फक्त महिलांसाठी नाहीतक पुरुषांसाठीही फायद्याचा आहे. याचा फायदा असा की, तुमच्या शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर तुम्ही तिथे हा सॅनिटरी पॅड लावून ठेवा. जो कुलिंग पॅडसारखा वापरू शकता. याचा वापर महिला, पुरुष, लहान मुलं कोणीही करू शकता. आपण शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर बर्फ लावतो त्याचप्रकारे हा पॅड लावू शकतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: पोळीला तेल-तुपाऐवजी लावा हार्पिक, Video पाहून नेटकरी म्हणाले, “कमाल झाली..” 

Kitchen Tips With Shweta या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय एकदा करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Story img Loader