scorecardresearch

Premium

Kitchen Jugaad: झोपण्याआधी फक्त एकदा तांदळामध्ये ही ‘पोटली’ ठेवा, सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Remedies For Insect Free Rice: किचनसाठी ‘जादूची पोटली’; तांदळाच्या डब्यात नक्की टाका आणि पाहा चमत्कार

kitchen tips in marathi pudina potli in rice keep insects away kitchen jugaad video viral
तांदूळात अळ्या किंवा काळ्या रंगाचे सोनकिडे, पोरकिडे झाले असतील तर हा काही घरगुती उपाय करून बघा( Photo: @creatorsearch2.029)

Kitchen Jugaad Video: गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. या गृहिणीने तांदळाच्या डब्यात एक जादूची पोटली ठेवली आहे. ही जादूची पोटली तिने तांदळाच्या डब्यात टाकली आणि कमालच झाली. या जादूच्या पोटलीने काय चमत्कार केला ते तुम्हीच पाहा. किचन जुगाडा चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

गृहिणींनो किचनमध्ये वापरता येईल अशी जादूची पोटली

how to avoid boiling over milk in marathi
Kitchen jugad video: गृहिणींनो दुधाच्या भांड्यात फक्त एक चमचा रोज न चुकता ठेवा, कायमचं टेन्शन जाईल
kitchen tips in marathi rubber use for home cleaning tips
Kitchen Jugaad: पायपुसण्यावर फक्त एकदा ‘ही’ वस्तू फिरवा; VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
viral banana egg in soil field farming life hack jugaad video
Jugad video: केळी आणि अंड्यापासून घरीच बनवा कंपोस्ट खत, आता विकतच्या खताची गरजच पडणार नाही
Father and Daughter Viral Video
कलिंगड खाण्यासाठी चिमुकलीची धडपड; बाबांच्या कुशीतून अचानक मारली उडी अन्…VIDEO व्हायरल

या व्हिडीओमध्ये गृहिणीने किचनमध्ये वापरता येईल अशी जादूची पोटली दाखवली आहे. या जादुच्या पोटलीत नक्की काय आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तुम्हाला माहितीये आपण वर्षभरासाठी आपण तांदूळ आणतो आणि अगदी सगळी काळजी घेऊन साठवून ठेवतो. पण काही काळाने कधीतरी चुकून ओला हात लागतो किंवा तांदूळ भरताना काहीतरी राहून जातं आणि मग तांदळात किडे, अळ्या होण्यास सुरुवात होते. याचा लगेचच बंदोबस्त केला तर उत्तम. नाहीतर मग हळूहळू त्याचं प्रमाण वाढत जातं आणि मग तांदूळ साफ करणं कठीण होऊन जातं. एवढ्या महागड्या धान्याचं नुकसान होऊ नये म्हणून हे काही घरगुती उपाय करून बघा. काही किडे, अळ्या असतील तर निघून जातील आणि तांदूळ स्वच्छ होईल.

काय आहे या पोटलीत?

यासाठीच या गृहिणीने त्या पोटलीत पुदीन्याची पानं ठेवली आहेत. पुदिन्याच्या पानांमुळे तुमच्या तांदळाला कधीच कीड लागणार नाही किंवा अळ्या होणार नाहीत. मात्र यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे ही पुदिन्याची पानं आधी कडक उन्हात वाळवून घ्या त्यानंतर एका कपड्याची पोटली बांधा आणि तांदूळ घरी आणल्यानंतर तांदळाच्या डब्यात ठेवा. आधीपासून जरी तांदळात किडे असतील तरीही एका रात्रीतच हे सगळे किडे वासामुळे वर येतील.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: फ्रिजमध्ये बटाट्याची कमाल! झोपण्याधी फक्त एकदा…पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल

Creator Search 2.0 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen tips in marathi pudina potli in rice keep insects away kitchen jugaad video viral srk

First published on: 29-09-2023 at 10:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×