scorecardresearch

Premium

Toilet Cleaning Tips: किचनमधील हळदीची टॉयलेटमध्ये कमाल; वारंवार स्वच्छ करण्याची झंझट कायमची मिटली

Kitchen Jugaad Video : किचनमधील हळदीनं टॉयलेटमध्ये काय कमाल केली पाहाच…

kitchen tips in marathi use turmeric in toilet cleaning tips kitchen jugaad video viral
किचनमधील हळदीची टॉयलेटमध्ये कमाल (फोटो – @AvikaRawatFoods)

Kitchen Jugaad Video : बाथरूम आणि टॉयलेट नियमितपणे स्वच्छ करायला हवीत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती टॉयलेटचा वापर करते. त्यामुळे या भागात जंतूंचा वावरही अधिक असतो. संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी टॉयलेट स्वच्छ आणि निर्जंतूक असायला हवं आणि यासाठी चांगल्या दर्जाचं टॉयलेट क्लिनर तुम्ही वापरत असाल, मात्र तरीही काही गृहिणींची स्वच्छतेबाबत तक्रार असते. महागडे टॉयलेट क्लिनर वापरुनही दुर्गंधी, किटाणू जात नाहीत अशी तक्रार त्या करत असतात. यामुळेच आज आम्ही तुम्हाला किचनमधल्या एका गोष्टीचा उपयोग करुन टॉयलेट क्लिनिंगची समस्या कायमची दूर करणार आहोत.

किचनमधल्या छोट्या छोट्या वस्तू कधी कधी खूप मोठ्या कामाच्या असतात. हळदीचा वापर आपण स्वंयपाकात करतो. याशिवाय औषध म्हणून आणि सौंदर्यप्रसाधनांमध्येही हळद वापरली जाते. पण हळदीचा आणखी एक अनोखा असा वापर आहे. किचनमध्ये असणारी ही हळद टॉयलेटमध्येही खूप कामाची आहे. किचनमधील हळदीचा टॉयलेटमध्ये कमालीचा वापर आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कधी तुमच्याकडे टॉयलेट क्लिनर नसेल तर तुम्ही असं घरगुती टॉयलेट क्लिनर वापरू शकता.

After watching the video you will think 100 times before eating the fruit cake
फ्रूट केक आवडीने खाताय का? फॅक्टरीमधील Video पाहून केक खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल…
Remedies to sharp mixi blades
Kitchen Jugaad: मिक्सरमध्ये मीठ टाकताच झाली कमाल! VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
deepika padukon
‘जवान’मधील कॅमिओसाठी दीपिका पदुकोणने किती मानधन घेतलं? तिनेच केला खुलासा, म्हणाली “शाहरुखसाठी…”
kitchen tips in marathi how to keep jewellery safe in toilet home jugaad video trending
Jugaad: घराबाहेर जाताना टॉयलेटमध्ये ठेवा दागिने; काय आहे फायदा VIDEO एकदा पाहाच

हळदीची कमाल…

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, गृहिणीने एका भांड्यात हळद घेतली आहे. त्यात तिने लसणीच्या पाकळ्या किसून टाकल्या आहेत. यात पाणी मिक्स केलं. एक प्रकारचं सोल्युशन तिनं तयार केलं, ते तिने बाटलीत भरलं. हे मिश्रण तिने टॉयलेटमध्ये ओतलं आहे. त्यानंतर ब्रशने टॉयलेट घासलं आहे आणि चांगलं पाणी ओतून टॉयलेट स्वच्छ करून घेतलं आहे. यानंतर टॉयलेटच्या तळाशी राहिलेलं हळदीचं पाणी फ्लश करून घ्या.टॉयलेटमधील बॅक्टेरियांचा नाश होतो, शिवाय टॉयलेटमधून दुर्गंधीही येत नाही, असा दावा या महिलेने केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: पायपुसण्यावर कंगवा फिरवताच झाली कमाल! VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

व्हिनेगर :

तुमच्या घरी पांढरे व्हिनेगर असेल तर ते टॉयलेट पॉटमध्ये ओता आणि रात्रभर सोडा. किमान दोन कप व्हाईट व्हिनेगर वापरा. कोका-कोलासुद्धा व्हिनेगरप्रमाणेच काम करू शकते. पण ते १ तासापेक्षा जास्त काळ सोडू नका. फक्त पॉटचे डाग काढून टाका.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen tips in marathi use turmeric in toilet cleaning tips kitchen jugaad video viral srk

First published on: 17-09-2023 at 17:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×