Swollen Fingers and toes: हिवाळ्यात पायांना खाज सुटणे आणि सूज येणे सामान्य गोष्ट आहे. ही खाज किंवा पायांना येणारी सूज थंडीमुळे सुरू होते. अति थंडीमुळे त्वचेवर लालसरपणा, सूज आणि फोडही येतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही समस्या त्वचेतील लहान रक्तवाहिन्यांच्या सुजेमुळे निर्माण होते. जास्त थंडीत राहिल्याने किंवा थंड पाण्याच्या जास्त संपर्कात आल्याने त्वचेची ही समस्या अजून जास्त त्रास देते.

हिवाळ्यात हात-पायांवर खाज सुटणे आणि सूज येण्यामागे अनेक कारणे कारणीभूत असतात, जसे की कोरडे वातावरण, अनवाणी चालणे, जास्त वेळ मोजे घालणे यामुळे पायांना जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. मधुमेह, सोरायसिस यांसारख्या काही आरोग्य समस्यांमुळे हात किंवा पायांच्या बोटांमध्ये खाज सुटणे, सूज येणे आणि लालसरपणा येऊ शकतो.

Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Know the reason behind pain in the joints of hands and feet
हाताच्या व पायांच्या हाडांमध्ये सतत वेदना होतात का? जाणून घ्या यामागची कारणं
hand feet swelling
Body Swelling Remedies: तुमच्या हात-पायांना सूज येतेय? चुकूनही दुर्लक्ष करू नका; ‘हे’ घरगुती उपाय वापरून पहा; लवकरच आराम मिळेल

डॉक्टर बबिता राठोड यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, हिवाळ्यात हात आणि पायांची सूज, लालसरपणा आणि खाज दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरतात. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी खाज आणि सूज दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.

( हे ही वाचा: उंचीनुसार महिलांचे वजन नेमके किती असावे? पाहा शासनाने जाहीर केलेला ‘हा’ सोपा तक्ता)

हाता- पायांना खाज सुटण्यावर हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

बेकिंग सोड्याने करा खाजेवर उपचार (Treat itching with baking soda)

हिवाळ्यात पायांना खाज सुटणे आणि सूज येण्याचा त्रास होत असेल तर बेकिंग सोडा वापरा. पायांवर बेकिंग सोडा पेस्ट १० ते १५ मिनिटे लावून धुतल्यास खाज आणि सूज दूर होईल.

गरम पाण्याने हात- पाय शेकून घ्या (Hot-Water Irrigation)

हिवाळ्यात पाय जास्त दुखणे, खाज सुटणे, लालसरपणा जाणवत असेल तर बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात खडी मीठ किंवा तुरटी टाकून या पाण्याने हाता- पायांना शेक द्या. या उपायांचा वापर केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होईल आणि पायाची सूज आणि वेदना दूर होतील.

लसूण तेलाने मसाज ( massage with garlic oil)

एका भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात लसणाच्या ५ सोललेल्या पाकळ्या टाकून गॅसवर गरम करा. लसूण काळे होईपर्यंत तेलात लसूण शिजवा. हे तेल शिजल्यानंतर थंड झाल्यावर हाताच्या आणि बोटांना आणि पायाच्या बोटांना मसाज करा. या तेलाने मसाज केल्याने हात आणि पाय दुखणे आणि खाज सुटणे यापासून आराम मिळेल.

( हे ही वाचा: ‘या’ आजारांमुळे वाढतो किडनी निकामी होण्याचा धोका; डॉक्टरांकडून जाणून घ्या किडनीची योग्य काळजी कशी घ्यावी)

पायात मोजे आणि शूज घाला (Wear socks and shoes on your feet)

पाय दुखणे आणि सूज टाळण्यासाठी पायांना थंडीपासून वाचवा. पायात मोजे घाला आणि पायाला उष्णता द्या.

थंड पाणी टाळा (Avoid cold water)

पाय दुखणे, लालसरपणा आणि सूज असल्यास थंड पाण्यात राहू नका. ही ऍलर्जी आणि वेदना थंड पाण्याने वाढू शकतात. थंडीपासून हात व पायांचे संरक्षण करण्यासाठी हात व पाय उबदार कपड्याने गुंडाळा. हात आणि पायांच्या बोटांची सूज दूर करण्यासाठी व्यायाम करा.