आपला भारत देश प्राचीन आणि दोलायमान संस्कृती, उत्कृष्ट कला, पोशाख, मसाले तर वारसा या व्यतिरिक्त, ऐश्वर्य आणि संपन्नतेसाठी प्रसिद्ध आहे. सरकारने १९७१ मध्ये राजेशाही पदव्या रद्द केल्यानंतर भारतात राजे आणि राजघराण्यांचे अधिकृत राजवट बंद झाले असले तरी, त्यांच्या वारशाच्या खुणा कायम आहेत. पण, आजही काही भारतीय राजघराण्यांनी वारसा आणि लक्झरी यांनी भरलेली जीवनशैली स्वीकारली आहे. तर आज आपण अशाच सात राजघराण्यांबद्दल जाणून घेऊया.

मेवाड राजघराणे –

मेवाड राजघराणे हे भारतातील सर्वात जुने आणि सर्वात लक्षणीय शाही राजघराणे आहे. राजस्थानात महाराणा प्रताप पूजनीय आहेत. राजवंशाचे ७६ वे संरक्षक श्रीजी अरविंद सिंग मेवाड हे या कौटुंबिक वारशाचे नेतृत्व करतात. विशेष म्हणजे, ते एचआरएच (HRH) ग्रुप ऑफ हॉटेल्सचे अध्यक्षपद भूषवतात ; ज्यांना खाजगी मालकीखालील हेरिटेज पॅलेस-हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची एकमेव साखळी असण्याचा मान देण्यात आला आहे.

वाडियार राजघराणे –

वाडियार हे भारतातील शाही वंशातील सर्वात श्रीमंत वंशजांपैकी एक आहेत. २०१३ मध्ये श्रीकांतदत्त वाडियार यांच्या निधनानंतर राजमातेने यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांना त्यांचा मुलगा म्हणून दत्तक घेतले आणि त्यांना शाही पदवी बहाल केली. श्रीकांतदत्त हे यदुवीरचे काका होते. स्कूपहूपनुसार, १०,००० कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह यदुवीर आणि त्यांचे कुटुंब म्हैसूर पॅलेसमध्ये राहतात. याव्यतिरिक्त ते रॉयल सिल्क ऑफ म्हैसूर, एक प्रसिद्ध रेशीम ब्रँडचे मालक सुद्धा आहेत.

पतौडी नवाबाचे राजघराणे –

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचे दिवंगत वडील पतौडी नवाबाच्या राजघराण्याचे शेवटचे अधिकृत नवाब मन्सूर अली खान यांनी अभिनेत्री शर्मिला टागोरशी लग्न केले आणि त्यांनी तीन मुलांना एकत्र वाढवले. बॉलीवूड अभिनेता आता सैफ अली खान पतौडीचा नवाब ही पदवी धारण करतो. पण, त्याला वडिलांकडून राजवाड्याचा वारसा मिळाला नाही. त्याऐवजी त्याला हे हॉटेल्सच्या नीमराना ग्रुपकडून खरेदी करावे लागले ; ज्यांच्यासोबत त्याच्या वडिलांनी पूर्वी १७ वर्षांच्या लीजची (lease) व्यवस्था केली होती.

हेही वाचा…दिवसातून फक्त दोनदा ‘या’ ड्रायफ्रूटचे करा सेवन; थायरॉईड राहील नियंत्रणात? डॉक्टरांनी सांगितला फंडा

जयपूरचे राजघराणे –

जयपूरचे शेवटचे राजे भवानी सिंह यांनी त्यांची मुलगी दिया कुमारीचा मुलगा दत्ता घेणे पसंत केले. महाराजा सवाई मानसिंह आणि त्यांची पहिली पत्नी मरुधरचे पुत्र भवानी सिंह यांचा विवाह पद्मिनी देवी यांच्याशी झाला. दिया कुमारी ही त्यांनी एकुलती एक मुलगी आहे.दीया कुमारीचा विवाह नरेंद्र सिंह यांच्याशी झाला. त्यांना पद्मनाभ सिंह आणि लक्ष्यराज सिंह असे दोन मुले आणि मुलगी गौरवी आहे. दिया सध्या सवाई माधोपूर मधून भाजपच्या खासदार आहे.

जोधपूरचे राजघराणे –

जोधपूरचे माजी राज्यकर्ते, राठोड घराण्याचे वंशज महाराजा गजसिंग त्यांच्या कुटुंबासह भव्य ‘उम्मेद भवन पॅलेस’मध्ये राहतात. या महालाला जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानांपैकी एक म्हणून सन्मानित केले आहे. राजवाड्याचा काही भाग पर्यटकांसाठी प्रवेशयोग्य असला तरीही उर्वरित भाग ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सद्वारे देखरेख केला जातो ; जो कुटुंबासह पार्टनरशिप म्हणून कार्यरत आहे. याव्यतिरिक्त जोधपूरच्या राजघराण्याकडे प्रतिष्ठित मेहरानगड किल्ल्याची मालकी देखील आहे. तसेचज महाराजा गजसिंग त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात,. भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता कृष्णा कुमारी गर्ल्स पब्लिक स्कूलची देखील यांनी स्थापना केली.

गायकवाड राजघराणे –

बडोद्याचे गायकवाड वंशातील माजी राज्यकर्ते महाराजा समरजितसिंह राव गायकवाड आणि त्यांचे कुटुंबाचे लक्ष्मी विलास पॅलेस हे निवासस्थान आहे. महाराजा समरजितसिंग हे केवळ त्यांच्या शाही वारशासाठीच नव्हे तर क्रिकेटमधील त्यांच्या पराक्रमासाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांनी प्रतिष्ठित रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. स्कूपहूपच्या अहवालानुसार, त्याच्या वारसामध्ये २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता समाविष्ट आहे.

बिकानेरचं राजघराणं –

महाराजा करणी सिंह आणि महाराणी सुशीला कुमारी यांची कन्या राजकुमारी राज्यश्री कुमारी या बिकानेरमधील प्रतिष्ठित लालगढ पॅलेसच्या (Lallgarh Palace) सध्याच्या मालकीण आहेत. या राजकुमारीने वारशाचा उपयोग करून, राजवाड्याचा एक भाग एका भव्य हेरिटेज हॉटेलमध्ये बदलला आहे. अशा प्रकारे आज आपण या लेखातून भारतातील सात श्रीमंत राजघराण्यांची माहिती घेतली.