टेन्शन दुर करण्यासह 'या' समस्यांपासूनही स्ट्रेस बॉलमुळे मिळते सुटका, जाणून घ्या | Know amazing health benefits of using stress ball can be useful for muscle strength | Loksatta

टेन्शन दुर करण्यासह ‘या’ समस्यांपासूनही स्ट्रेस बॉलमुळे मिळते सुटका, जाणून घ्या

तणाव दुर करण्यासाठी स्ट्रेस बॉल वापरण्याचा सल्ला का दिला जातो जाणून घ्या

टेन्शन दुर करण्यासह ‘या’ समस्यांपासूनही स्ट्रेस बॉलमुळे मिळते सुटका, जाणून घ्या
स्ट्रेस बॉलचा उपयोग जाणून घ्या (फोटो: Freepik)

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना रोजच्या जीवनातील तणाव वाढलेला जाणवत आहे. अगदी तरुण मंडळींनाही या तणावामुळे अनेक गंभीर आजार होत आहेत. अशात सर्वांना मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले जाते. रोजच्या कामातून आपण आरोग्याची हेळसांड करतो, त्यामुळेच तणाव वाढून त्याचा परिणाम दिसून येतो. ज्या व्यक्तींना तणावाचा त्रास होतो, त्यांच्या हातात तुम्ही स्ट्रेस बॉल पाहिला असेल, हा स्ट्रेस बॉल कसा काम करतो जाणून घ्या.

स्ट्रेस बॉलचे कार्य
तणावाचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दुष्परिणाम होतो. त्यातीलच एक म्हणजे कॉर्टीसोल हॉर्मोनचे उत्पादन, कार्टीसोल हॉरमॉनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यासाठी जेव्हा स्ट्रेस बॉल हातात धरून प्रेस केला जातो तेव्हा तिथल्या स्नायुंवर ताण पडतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते.

आणखी वाचा: रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो का? जाणून घ्या यामागचे कारण

तणाव कमी करण्यासह स्ट्रेस बॉलमुळे हाताचे स्नायू मजबुत करण्यासही मदत होते. जर हाताला एखादी दुखापत झाली असेल आणि बरी झाल्यानंतरही त्याच्या वेदना सतावत असतील तर स्ट्रेस बॉलमुळे त्या वेदनांपासून सुटका मिळण्यास मदत होते. तसेच स्ट्रेस बॉल एक्युप्रेशरचेही काम करते. त्यामुळे स्ट्रेस बॉल वापरण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 12:54 IST
Next Story
‘त्या’ ठिकाणचे केस काढण्यापूर्वी हे वाचा!