Benefits of watermelon seeds: उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड खाण्याची मजा काही औरच असते. आजवर आपण छान रसाळ व मधाळ कलिंगडाचे अनेक फायदे ऐकले आहेत. शरीर हायड्रेटेड राहते, त्वचा तुकतुकीत दिसते वगैरे. पण, कलिंगडाइतक्याच त्याच्या बियासुद्धा अत्यंत फायदेशीर असतात, हे तुम्हाला माहीत होतं का? अनेक फळांच्या बियांमध्ये अत्यंत पोषक अशी सत्त्वं असतात, जसे की चिया सीड्स, सूर्यफुलाच्या बिया इत्यादी, त्याचप्रमाणे कलिंगडाच्या बिया सुद्धा तुमच्या आरोग्याला खूप मदत करू शकतात. अनेकदा जितक्या कमी बिया असतील तितकं कलिंगड चांगलं, असा आपला समज असतो; पण मंडळी हे अगदीच चुकीचं आहे. आता ही मदत नेमकी कशी हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…

कलिंगडच्या बिया अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असून त्यांचे असंख्य फायदे आहेत. त्या आकाराने खूप लहान असतात, त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. कलिंगडाच्या बियांमध्ये लोह, जस्त, प्रथिने आणि सूक्ष्म पोषक तत्त्वं लक्षणीय प्रमाणात असतात. त्या हृदयरोग आणि मधुमेहापासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि वजन कमी करण्यास मदत करण्यासाठी देखील त्यांचा वापर केला जाऊ शकतो.

कलिंगडाच्या बियांचे फायदे –

Award Banner

कमी कॅलरीज –

कलिंगडाच्या बियांमध्ये कॅलरी खूप कमी असतात. ३० ग्रॅम बियांमध्ये अंदाजे १५८ कॅलरीज असतात. अंदाजे कलिंगडाच्या ४०० बिया खाणे हे ३० ग्रॅम पाण्याइतकेच आहे. मूठभर कलिंगडाच्या बियांमध्ये बटाटा चिप्सच्या एका पाकिटापेक्षा कमी कॅलरीज असतात

मॅग्नेशियम –

कलिंगडच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असते. कलिंगडाच्या मूठभर बियांमध्ये अंदाजे २१ ग्रॅम मॅग्नेशियम असते. ते शरीरातील चयापचय प्रक्रिया नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच ते नसा, स्नायू आणि हृदयासाठीदेखील फायदेशीर आहे.

लोह –

कलिंगडाच्या मूठभर बियांमध्ये ०.२९ ग्रॅम लोह असते. लोह शरीरातील कॅलरीजचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी होण्यास लक्षणीय मदत होऊ शकते.

फोलेट –

फोलेट मेंदूचे कार्य व्यवस्थित चालू ठेवण्यास मदत करते. तसेच ते शरीरातील अमिनो ॲसिडची पातळी नियंत्रित करते. फोलेट हे गर्भवती महिलांसाठी एक अत्यावश्यक पोषक तत्त्व आहे. ते गर्भधारणेतील अनेक गुंतागुंत टाळण्यास मदत करू शकते.

चांगले फॅट्स –

कलिंगडच्या बियांमध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचा साठा असतो. हे फॅट्स स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी ओळखले जातात.