काही आठवड्यांपूर्वी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री छवि मित्तलने तिच्या स्तनाच्या कर्करोगबद्दल सांगितले होते. आता महिमा चौधरीने तिच्या स्तनाच्या कर्करोगबद्दल खुलासा केला आहे. महिमा चौधरीची केमोथेरपी झाली, त्यामुळे तिचे सर्व केस गळले आहेत. महिमा चौधरीमुळे पुन्हा एकदा स्तनाच्या कर्करोगबद्दल चर्चा सुरु झाली. या आजाराबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. म्हणूनच स्तनाच्या कर्करोगबद्दल असलेली मिथक आणि तथ्य जाणून घेऊयात तज्ञांकडून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्तनाचा कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत, ज्यामुळे आयुष्यातील सर्व काही ठप्प होते.  कॅन्सरशी लढा शारिरीक व मानसिकरित्या दिला गेला पाहिजे. एक सामान्य मिथक अशाप्रकारे आहे की, स्तनाचा कर्करोग केवळ मध्यमवयीन स्त्रियांमध्ये होतो. सत्य हे आहे की, तरुण स्त्रियाना आणि पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. एक अतिशय सामान्य समज अशी आहे की, जास्त साखर किंवा दुग्ध सेवन केल्याने कर्करोगाच्या पेशींना पोषण मिळते आणि कर्करोग होतो. वस्तुस्थिती अशी आहे की अद्याप असा कोणताही अभ्यास नाही की ज्याने अशी गोष्ट सिद्ध केली आहे. लठ्ठपणामुळे स्तन कर्करोग होण्याची एक शक्यता आहे, परंतु साखर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे कर्करोग होण्यामागे कोणतीही भूमिका नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know breast cancer myths facts from experts ttg
First published on: 09-06-2022 at 17:18 IST