scorecardresearch

Premium

१८ वर्षे पूर्ण होण्याआधीही बनवू शकता पॅन कार्ड, जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

lifestyle
यशस्वी पडताळणीनंतर १५ दिवसात पॅन कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचेल.(photo: file photo)

पॅन कार्डचा वापर महत्त्वाचा कागदपत्र म्हणून केला जातो. आर्थिक व्यवहारांपासून ते इतर ओळखपत्रांपर्यंत त्याचा वापर केला जातो. सरकारी कार्यालयांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तसेच बँक खाती उघडण्यासाठी आणि कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. PAN कार्ड सहसा १८ वर्षांच्या वयानंतर मिळू शकतात, परंतु ते आता १८ वर्षांच्या आधी देखील बनवता येतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी पॅन कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही या सूचना जाणून घेऊ शकता.

१८ वर्षांखालील मुलाचे पॅनकार्ड

जर तुम्हाला १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी पॅनकार्डसाठी अर्ज करायचा असेल, तर हे लक्षात घेतले पाहिजे की कोणताही अल्पवयीन व्यक्ती स्वतःहून पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत नाही. मुलाचे पालक यासाठी अर्ज करू शकतात. चला जाणून घेऊया अर्ज करण्याची ही सोपी पद्धत..

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

आता अल्पवयीन व्यक्तीच्या वयाचा पुरावा आणि पालकांच्या छायाचित्रासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह योग्य पर्याय निवडून वेबसाइटवर आवश्यक असलेली सर्व माहिती भरा.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, केवळ पालकच त्यांच्या मुलांविरुद्ध एफआयआर दाखल करू शकतात.

त्यानंतर तुम्ही १०७ रुपये फी भरा आणि अर्ज सबमिट करा.

तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाचा मागोवा घेऊ शकता.

यशस्वी पडताळणीनंतर १५ दिवसात पॅन कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचेल.

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर

ही कागदपत्रे आवश्यक आहेत

सर्वप्रथम अल्पवयीन मुलाच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक आहे.

अर्जदाराचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा असावा.

आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र अल्पवयीन व्यक्तीच्या पालकाच्या ओळखीचा पुरावा म्हणून सादर करावे लागेल.

पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्डची प्रत, पोस्ट ऑफिस पासबुक, मालमत्ता नोंदणीचे दस्तऐवज किंवा मूळ रहिवासी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know how to make pan card for before the age of 18 year follow these steps scsm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×