इंटरनेटचा वापर वाढल्याने वायफायबरोबरच ब्रॉडबँड सेवेचा वापरही वाढल्याचे पाहायला मिळते. बीएसएनएलचे लँडलाइन असणारे लोक तर याच पर्यायाला प्राधान्य देताना दिसतात. बीएसएनएल दर सहा महिन्यांनी आपला ब्रॉडब्रॅण्ड प्लॅन अपडेट करत असते. यामध्ये कमीत कमी किमतीत ग्राहकांना इंटरनेट सुविधा देणे हा मुख्य उद्देश असतो. हाच ट्रेंड फॉलो करत कंपनीने पुन्हा एकदा दमदार ब्रॉडब्रॅण्ड प्लॅन जाहीर केले आहेत. हे प्लॅन जास्त किमतीचे असले तरीही ते वैयक्तिक वापरासाठी किंवा कार्यालयीन वापरासाठी उपयुक्त ठरु शकतात. यामध्ये बीएसएनएलने ६७५ रुपये, ८४५ रुपये, ९९९ रुपये, १४९५ रुपये, १७४५ आणि २२९५ रुपयांचे प्लॅन आहेत.

६७५ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३५ जबी डेटा मिळत होता. आता ती लिमिट वाढवण्यात आली असून रोज ५ जीबी म्हणजेच एकूण १५० जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना १० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तर लिमिट संपल्यानंतर युजर्सना २ एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळणार आहे.

८४५ रुपयांचा प्लॅन

८४५ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना १० एमबीपीएस स्पीडने रोज १० जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजे महिन्याला ३०० जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये केवळ ५० जीबी डेटा मिळायचा, पण आता त्याचे लिमिट खूप वाढवण्यात आले आहे. आता या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंग सुविधाही मिळणार आहे.

९९९ आणि १९९९ रुपये

९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १५ जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा १० एमबीपीएसच्या स्पीडने मिळेल. तर ११९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना रोज २० जीबी डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्सना २ एमबीपीएसच्या स्पीडने मिळेल.