scorecardresearch

Blood Pressure: उन्हाळ्यात ब्लड प्रेशर जास्त राहिल्यास नाश्त्यात ‘या’ फळांचा करा समावेश

उन्हाळ्याच्या दिवसात तापमान झपाट्याने वाढू लागले आहे, वाढत्या तापमानाचा परिणाम रक्तदाबाच्या रुग्णांना अडचणीत आणू शकतो.

उन्हाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नाश्त्यामध्ये या फळांचा समावेश करावा. (photo credit: freepik)

उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जाणारा आजार आहे. त्याचे प्रमाण आणि वाढ दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. खराब जीवनशैली, तणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उन्हाळ्यात हा आजार अधिक त्रासदायक ठरतो. उन्हाळ्याच्या दिवसात लोकांचा रक्तदाब खूप जास्त असतो, त्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. काही वेळा उच्च रक्तदाबामुळे रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरात अंदाजे १.१३ अब्ज लोकं उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. WHO नुसार २०१५मध्ये, ५ पैकी १ महिला आणि ४ पैकी १ पुरुषांना उच्च रक्तदाब होता. २०२० च्या पुनरावलोकनाने असा निष्कर्ष काढला आहे की उच्च रक्तदाब हा जगभरातील हृदयविकार आणि अकाली मृत्यूसाठी प्रमुख जोखीम घटक आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात तापमान झपाट्याने वाढू लागले आहे, वाढत्या तापमानाचा परिणाम रक्तदाबाच्या रुग्णांना अडचणीत आणू शकतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, अशा लोकांना डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते, कडक सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी उन्हाळ्यात स्वत:ला थंड ठेवा आणि असे अन्न खा जे बीपी नियंत्रणात ठेवते. उन्हाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नाश्त्यामध्ये कोणत्या फळांचा समावेश करावा ते जाणून घेऊया.

केळ

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नाश्त्यात केळी खावी. केळी हे सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असलेले फळ आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी नाश्त्यात केळी खावी, याने रक्तदाब नियंत्रणात राहील.

सफरचंद खा

सफरचंद खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. सफरचंदांमध्ये विरघळणारे फायबर चांगले असते, जे एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते.

बेरी खा

ब्लड प्रेशरच्या रुग्णांना अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त असलेल्या बेरीचे सेवन केल्याने फायदा होतो. बेरीमध्ये असलेले अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट रक्तातील नायट्रिक ऑक्साइडची पातळी वाढवते, ज्यामुळे ते खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो.

आवळा रक्तदाब नियंत्रित करतो

औषधी गुणधर्मांनी समृद्ध आवळ्याचा रस रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. रोज एक चमचा आवळ्याच्या रसात १ चमचा मध मिसळून सकाळ संध्याकाळ सेवन केल्यास फायदा होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know the 5 best fruits for high blood pressure patients scsm

ताज्या बातम्या