scorecardresearch

उपवासाच्या दिवशी वजन नियंत्रित राहण्यासाठी अवलंबा ‘हा’ डाएट प्लॅन, जाणून घ्या

तज्ज्ञांच्या मते, उपवास केल्याने शरीराला डिटॉक्स करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पोषणतज्ञ दिव्या सोबती सांगतात की उपवास करणे हा वजन कमी करण्याचा आणि शरीराला टोन करण्याचा उत्तम मार्ग आहे.

उपवास करताना आहाराची काळजी घेतली नाही तर वजनही वाढू शकते. (photo credit: freepik)

उपवास करणे शरीरासाठी चांगले असते. तज्ज्ञांच्या मते, उपवास केल्याने शरीराला डिटॉक्स करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पोषणतज्ञ दिव्या सोबती सांगतात की उपवास करणे हा वजन कमी करण्याचा आणि शरीराला टोन करण्याचा उत्तम मार्ग आहे. तसेच उपवास करताना आहाराची काळजी घेतली नाही तर वजनही वाढू शकते.

तज्ञ सांगतात की उपवास करताना आपण काही अशा चुका करतो, ज्यामुळे आपले वजन वेगाने वाढू लागते. आहारात केलेल्या चुका सुधारल्या तर वजन सहज कमी करता येते, तसेच शरीर डिटॉक्स करता येते. बर्‍याचदा अनेक लोकं उपवसाच्या दिवशी काही खातपित नाही. तसेच अनेकजण उपवास म्हणून मांसाहारी पदार्थ न खाता शांहकारी पदार्थ खातात, मात्र उपवासात नेमकी तुमचा आहार कसा असला पाहिजे तसेच उपवासाच्या काळात वजन कमी करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा डाएट प्लॅन अवलंबला पाहिजे. चला जाणून घेऊयात.

अधिक फळ भाज्या खा

उपवासाच्या दरम्यान तुम्ही फळ भाज्यांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहते. फळ भाज्यांचे सूप बनवून त्याचे सेवन देखील करू शकता असे केल्यास वजन नियंत्रणात राहील.

थोड्या थोड्या वेळाने खात राहणे

काही लोकांना असे वाटते की उपवास म्हणजे अन्न न खाणे आणि स्वतःला उपाशी ठेवणे. असे केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागते आणि तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते. त्यातच एकाच वेळी जड अन्न खाण्याऐवजी, तुम्ही जर दिवसातून तीन किंवा चार वेळा थोडे थोडे खात राहिले तर तुमचे वजन कमी होईल.

शरीर हायड्रेटेड ठेवा

सध्या उन्हाळयात उपवास करताना पाणी न पिल्याने भूक लागते आणि शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. या दरम्यान, शरीर हायड्रेटेड ठेवा आणि अधिक पाणी प्या. जर तुम्हाला साधे पाणी पिणे आवडत नसेल तर तुम्ही लिंबू पाणी, नारळ पाणी, भाज्यांचा रस आणि फळांचा रस सेवन करा.

शरीर सक्रिय ठेवा

उपवास करताना तुम्हाला थकवा वाटत असतो. अशा स्थितीत तुम्हाला जास्त आराम करण्याची आणि कमी चालण्याची इच्छा असते. पण असे करणे योग्य नाही. उपवास करताना शरीर सक्रिय ठेवा आणि चाला, तुमचे वजन वाढणार नाही तर कमी होईल.

घरगुती स्नॅक्स खा

वजन कमी करायचे असेल तर घरगुती फराळाचे सेवन करा. घरगुती स्नॅक्स वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग आहे. बाजारात बनवलेले चिप्स, लाडू, वडे इत्यादी उपवासाच्या ऐवजी तुम्ही घरीच भाजलेले शेंगदाणे किंवा मखणा यांचे सेवन करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know the fast diet plan that can help you lose weight scsm